शिवजी गोरे, प्रतिनिधीरत्नागिरी, 23 जून: रत्नागिरी जिल्ह्यात (Ratnagiri) एका अजगराला जिवंत (python burn alive) जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजगराला जिवंत जाळतानाचा व्हिडीओ सुद्धा शूट करण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल (Video viral) होताच संताप व्यक्त करण्यात येत असून दोषी तीन व्यक्तीविरुद्ध वनविभागाने गुन्हा नोंदवला आहे.
अजगराने कोंबडी पकडल्याने त्या अजगराला जिवंत जाळल्याचा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाटे पडवेवाडी येथे घडला आहे. या प्रकरणी राजापूर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. विजय भिकाजी पारकर वय 53, वंदना विजय पारकर वय 44, मानसी मंगेश पारकर वय 27 अशी या गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.
Vat Purnima 2021 wishes in Marathi: वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे Facebook, WhatsApp मेसेज
22 जून 2021 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोंबडीला अजगर खात असलेचे दिसल्यानंतर कावरचे सहाय्याने अजगरास मारले. यानंतर नारळाच्या झावळया टाकून अर्धवट जाळून त्याचा व्हिडीओ शूट केला. तो सोशील मीडियावर व्हायरल केला. तसेच अर्धवट जाळलेला अजगर व कोंबडी त्यांचे घरामागे असलेल्या ओढयाजवळ नेऊन टाकले.
या प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या अनुषंगाने अजगराला मारून जाळलेबाबतची माहिती मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीनी गुन्हा कबुल केला आहे. सदर आरोपी वनविभागाने ताब्यात घेतले आहे. पुढील तपास चालू आहे अशी माहिती वन विभागाने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.