गडकरींच्या आदेशानंतर पाहणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना खड्ड्यांचा दणका, गाडीला अपघात!

गडकरींच्या आदेशानंतर पाहणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना खड्ड्यांचा दणका, गाडीला अपघात!

रस्त्यांची झालेल्या दुरावस्थेची पाहणी करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिल्यानंतर अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यानंतर पाहणी करायला जाताना त्यांच्याच गाडीला अपघात झाला.

  • Share this:

औरंगाबाद, 05 नोव्हेंबर : राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल सातत्याने नागरिकांकडून आवाज उठवला जातो. तरीही त्याकडे सरकारचे दुर्लक्षच होत असते. अनेकदा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्राणही गमवावा लागला आहे. आता रस्त्यातील खड्ड्याचा दणका तपासणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनाच बसला आहे. औरंगाबाद-जळगाव महामार्गावर पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची गाडीच खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात पुलावरून कोसळली.

गेल्या आठवड्यात राष्ट्रावदी काँग्रेसचे युवक प्रदेश सचिव आशिष मेटे यांनी चिखलात रुतलेल्या एसटीचा फोटो पोस्ट करताना नितीन गडकरी यांना टॅग केलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, जागतिक वारसा असलेल्या अजिंठा लेणीला जाणारा हा आहे औरंगाबाद-जळगाव हायवे. गेल्या चार वर्षापासुन ह्या अश्या रस्त्यांवरुन जनता जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे. आदरणीय नितीन गडकरी साहेब आपण यामध्ये लक्ष घालावे कारण दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण या रस्त्यावर वाढत आहे.

आशिष मेटे यांच्या ट्विटची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना झापले. तसेच रस्त्याची पाहणी करून आठवड्याच्या आत स्थिती सुधारण्याचे आदेश दिले. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना बजावले की यात बेजबाबदारपणा, हलगर्जीपणा झाल्यास कोणाला माफ केलं जाणार नाही. त्यानंतर होणाऱ्या परिणामांना सामोरं जायची तयारी ठेवा असा इशाराही गडकरींनी दिला होता.

आता केंद्रातूनच आदेश आल्यावर अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. गडकरींच्या ट्विटनंतर अधिकाऱ्यांच पथक रस्त्याची पाहणी करायला निघालं खरं पण ते संबंधित ठिकाणी पोहचण्याआधीच अपघातग्रस्त झालं. त्यांचीच गाडी रस्त्यावरचा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात पुलावरून कोसळली. मात्र, गाडीचे ब्रेक अडकल्याने आणि टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे.

सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. सहा अधिकाऱी जखमी झाले असून त्यांच्यावर सिल्लोड इथं उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर अधिकाऱ्यांनी पाल, मंगरुळ, बनकिन्होळा, चिखली भोकरदन इथल्या रस्त्यांची पाहणी केल्याचं समजते. अधिकाऱ्यांनाच दणका बसल्याने आता तरी रस्त्यांची अवस्था सुधारेल अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे.

<strong>गडकरी-फडणवीस आमच्यासाठी एकच, संजय राऊतांच्या विधानाचा अर्थ काय?</strong>

<iframe id="story-417416" class="video-iframe-bg-color iframe-onload" src="https://lokmat.news18.com/embed/videos/NDE3NDE2/" width="100%" height="150" frameborder="0" scrolling="no"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: aurangabad
First Published: Nov 5, 2019 02:36 PM IST

ताज्या बातम्या