सावधान, यापुढे पंजाबमध्ये ड्रगची तस्करी केल्यास...!

सावधान, यापुढे पंजाबमध्ये ड्रगची तस्करी केल्यास...!

तरुणांमधील अंमली पदार्थांची वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी पंजाब सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

  • Share this:

पंजाब, 03 जुलै : तरुणांमधील अंमली पदार्थांची वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी पंजाब सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांना थेट मृत्युदंड देण्यात यावा असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.

या प्रस्तावाला जर केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवला तर पंजाबमध्ये ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांवर अंकुश ठेवता येणं शक्य होणार आहे. पंजाब सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

LIVE : अंधेरी रेल्वे रुळावर पुल कोसळल्याने 3 जण जखमी

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, 'ड्रग्ज तस्करांनी पंजाबच्या तरुणांचे भविष्य बरबाद केले आहे. यासाठी त्यांना कडक शिक्षा मिळायला हवी.' राज्य नशामुक्त करण्याच्या संकल्पावर पंजाब सरकार अजूनही ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यापूर्वी पंजाब सरकारने हत्यारांचे लायसन्स देण्यासाठी अर्जदाराची उत्तेजक चाचणी अनिवार्य केली होती. आणि त्यानंतर आता महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच लागू करण्याच्या ते तयारीत आहेत. पण आता केंद्र सरकार यावर काय निर्णय देतं याकडे पाहणं महत्त्वाचं आहे.

पंजाब सरकारच्या या अतिमहत्त्वाच्या निर्णयाला जर मंजूरी मिळाली तर ड्र्ग्ज तस्करी करणाऱ्यांना चाप बसेल हे नक्की.

हेही वाचा...

जुलैच्या पहिल्या आठवड्यात निघणारी म्हाडाची लॉटरी लांबणीवर !

अंधेरीत पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे रुळावर कोसळला !

प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीवर चाकूने केले वार

First published: July 3, 2018, 9:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading