Coronavirus : पुण्यात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ; अनलॉकचा मोठा फटका

Coronavirus : पुण्यात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ; अनलॉकचा मोठा फटका

मुंबईनंतर पुण्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात अनलॉकनंतर मोठा फटका बसला आहे

  • Share this:

पुणे, 27 जून : मुंबईनंतर पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात पुण्यात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. आज रात्री 9 वाजेपर्यंत पुण्यात कोरोनाचे 996 रुग्ण आढळून आले आहे. ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे.

त्यानुसार सध्या पुण्यात एकूण रुग्णसंख्या 20023 पर्यंत पोहोचली आहे. आज पुण्यात 19 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूचा आकडा 693 इतकी झाली आहे.

हे वाचा-अनलॉक-2 बाबत चर्चा सुरू, हॉटलेसह आणखी काय सुरू होण्याची आहे शक्यता? जाणून घ्या

लॉकडाऊन उठताच 25 दिवसातच पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास तिपटीने वाढली आहे. 25 मार्चला लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर 14 एप्रिलपर्यंत पुणे शहरात 299 कोरोना रुग्ण आढळले होते. तर 15 एप्रिल ते 3 मे या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात पुण्यात 1444 रुग्ण आढळून आले. तर 4 मे ते 17 मे या तिसऱ्या टप्प्यातही पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊन हा आकडा 1641 पर्यंत गेला.

हे वाचा-Covid - 19 : लग्नसोहळा आयोजित करणाऱ्याला 6 लाखांचा दंड, काय आहे कारण?

- दिवसभरात 486 रुग्णांना डिस्चार्ज

- पुण्यात 19 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

- 308 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 65 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 20023

- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 5892

- एकूण मृत्यू -693

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 9119

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 3255

First published: June 27, 2020, 10:28 PM IST

ताज्या बातम्या