पालकमंत्र्यांची यादी जाहीर, पुणे अजित पवार तर आदित्य ठाकरे मुंबई उपनगर!

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, पुणे अजित पवार तर आदित्य ठाकरे मुंबई उपनगर!

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रिपदाची यादीही जाहीर करण्यात आली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 08 जानेवारी : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकासआघाडी सरकार स्थापन केलं. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रिपदाची यादीही जाहीर करण्यात आली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांचीही पालकमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नवीन मंत्र्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी सर्व मंत्र्यांना मार्गदर्शन केलं. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करणार असल्याची घोषणा केली. तसंच पुण्याच्या पालकमंत्रिपदी माझी नियुक्ती करणार असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं, आता त्यांनी तसं सांगितलं आहे, काय निर्णय जाहीर करतील हे सर्वांना मान्य राहणार आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्याची यादी जाहीर केली.

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

1.  पुणे-  अजित अनंतराव पवार

2. मुंबई शहर-. अस्लम रमजान अली शेख

3. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे

4. ठाणे-  एकनाथ संभाजी शिंदे

5. रायगड - आदिती सुनिल तटकरे

6. रत्नागिरी- अनिल दत्तात्रय परब

7.  सिंधुदुर्ग-  उदय रविंद्र सामंत

8.  पालघर-  दादाजी दगडू भुसे

9. नाशिक-  छगन चंद्रकांत भुजबळ

10. धुळे-  अब्दुल नबी सत्तार

11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी

12. जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील

13.अहमदनगर-  हसन मियालाल मुश्रीफ

14. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

15. सांगली- जयंत राजाराम पाटील

16. सोलापूर-  दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

17. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

18.औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई

19. जालना-  राजेश अंकुशराव टोपे

20. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

21. हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड

22. बीड-  धनंजय पंडितराव मुंडे

23. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण

24. उस्मानाबाद-  शंकरराव यशवंतराव गडाख

25. लातूर-  अमित विलासराव देशमुख

26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

27. अकोला-  ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

28. वाशिम-  शंभुराज शिवाजीराव देसाई

29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

30. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड

31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत

32. वर्धा-  सुनिल छत्रपाल केदार

33. भंडारा-  सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

34. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख

35. चंद्रपूर-  विजय नामदेवराव वडेट्टीवार

36.  गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे

 

बाळासाहेब थोरातांना मिळालं पालकमंत्रिपद!

काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आधी पालकमंत्रिपद घेण्यास नकार दिला होता. परंतु, अखेर त्यांना कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.  कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू होती. अखेर कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हे काँग्रेसच्या वाट्याला देण्यात आलं. तर थोरात यांच्या अहमदनगरच्या जिल्ह्याचं  हसन मियालाल मुश्रीफ यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.

आदित्य ठाकरेही पालकमंत्री

मुंबई उपनगर जबाबदारी थेट आदित्य ठाकरे यांना तर मुंबई शहर जबाबदारी अस्लम शेख यांना दिली. रत्नागिरी अनिल परब यांना दिली तर सिद्धुदुर्ग जबाबदारी उदय सामंत यांना दिली. रायगड हे सुनिल तटकरे यांनी कन्या राज्यमंत्री आदिती तटकरे पालकमंत्री असेल. पालघर जबाबदारी दादाजी भुसे यांना देत कोकण पट्टा सेनेनी स्वतःकडे ठेवला.

मुंबई शहरात एकुण ३६ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी सर्वाधीक २६ विधानसभा मतदारसंघ हे मुंबई उपनगर शहरात येतात. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि पक्ष संघटनात्मक मजबूत करण्यासाठी आणि विकासात्मक मोठे प्रकल्प मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरू करण्यासाठी शिवसेनेची ही रणनिती असल्याचं बोललं जातंय.

एकनाथ शिंदे दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे आणि गडचिरोली या २ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सिंधुदूर्ग जिल्ह्यात उदय सामंत यांना पालकमंत्री म्हणून नारायण राणे यांचा सामना करण्यासाठी मैदानात उतरवलंय. तर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अनिल परब यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

वडेट्टीवार नाराज नाही

विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल एक चूक झाली आहे. जेव्हा काँग्रेसकडून त्यांना खातं दिलं गेलं तेव्हा मदत आणि पुनर्वसन खाते दिले जाणार असं सांगितलं. पण जेव्हा खातेवाटप जाहीर झालं तेव्हा भूकंप आणि पुनर्वसन झालं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ते पद बदलून देणार असं सांगितलं. त्यामुळे वडेट्टीवार नाराज नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. याआधीही प्रिंटिग मिस्टेकमुळे काही मंत्र्यांची तर नावंच वगळली गेली, असंही घडलं आहे, त्यामुळे नाराज होण्याचं कारण नाही, असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, आज 16 मंत्री आणि राज्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी पालकमंत्री म्हणून कशी जबाबदारी पार पाडायची. पक्षाला कसा वेळ द्यायचा याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. मंत्री आणि राज्यमंत्र्यांनीही काही प्रश्न शरद पवार यांना विचारले, असल्याची माहितीही अजितदादांनी दिली.

Published by: sachin Salve
First published: January 8, 2020, 8:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading