एसी, फॅन नसतानाही 'या' पुणेकराच्या घरात तापमान फक्त 23 वर

एसी, फॅन नसतानाही 'या' पुणेकराच्या घरात तापमान फक्त 23 वर

पुण्यातील पारा ४२ डिग्री सेल्सियसपर्यंत चढलाय. इतक्या कडाक्याच्या उन्हातही दारवटकरांच्या घरातलं तापमान २३.४० डिग्री सेल्सियस आहे.

  • Share this:

गोपाल मोटघरे, पुणे

22 एप्रिल : एअर कंडिशनर खरेदीकरण आणि त्याचा वापर करून वीज बिलाचा भुर्दंड सोसणं हे जरा कठीणच...पण एका पुणेकरांने उष्णतेवर मात देऊन घरात थंडावा निर्माण केलाय.

स्वस्तात घरात गारवा निर्माण करता येईल का यासाठी पुण्यातील सुखसागर नगर येथे राहणारे उमेश दारवटकर गेली पाच - सहा वर्षा प्रयत्नशील आहेत. आणि या वर्षी त्यांना त्यात यश देखील आलं.

एप्रिल महिन्यातच पुण्यातील पारा ४२ डिग्री सेल्सियसपर्यंत चढलाय. इतक्या कडाक्याच्या उन्हातही दारवटकरांच्या घरातलं तापमान २३.४० डिग्री सेल्सियस आहे. कोणत्याही कुलर, पंखे आणि एअर कंडिशनर शिवाय दारवटकर कुटुंबीयांनी त्याच्या घरात गारवा निर्माण केला आहे.

घराच्या स्लॅब वर तागाचं पोतं आंथरुन त्यावर थर्माकॉलचं आवरण करून स्प्रिंकलद्वारे स्लॅब वर पाणी फवारलंय. आपल्या घरात अत्यंत कमी खर्चात हा प्रयोग करता येईल असं उमेश दारवटकरांचं म्हणणं आहे.

एअर कंडिशनरच्या कृत्रिम गार वारा काहीजणांना सहन होत नाही अशावेळी आपल्या घरात कमी खर्चात हा प्रयोग करता येणं शक्य आहे.

First published: April 22, 2017, 4:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading