पुणे, 07 डिसेंबर: पुण्यातील मुंढवा परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका तरुणीवर तिच्याच एका मित्राने बलात्कार (Young woman raped by friend) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी तरुणानं गुंगीचं औषध देत तरुणीवर बलात्कार केला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) प्रकरण मिटवलं आहे. पण पीडित तरुणी गर्भवती (Victim become pregnant) राहिल्यानंतर, मात्र आरोपीनं पीडितेला शिवीगाळ करत लग्नास नकार (Abused and refused to marriage) दिला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
नदीम बाबू शेख असं गुन्हा दाखल झालेल्या 32 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपी नदीम हा मुंबईतील रहिवासी असून एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. पीडित तरुणी आणि आरोपी हे मित्र असून गेल्या काही काळापासून ते एकमेकांना ओळखतात. तर 27 वर्षीय पीडित तरुणी इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होती. पण लॉकडाऊननंतर त्या घरीच होत्या.
हेही वाचा-गुंगीचं औषध देत 17 मुलींवर लैंगिक अत्याचार; प्रॅक्टिकलच्या बहाण्याने नेलं अन्...
दरम्यान सप्टेंबर महिन्यात आरोपी नदीम हा पीडित तरुणीच्या घरी आला होता. यावेळी आरोपीनं पीडितेला गुंगीचं औषध दिल्याने ती बेशुद्ध झाली. हीच संधी साधत आरोपीनं बेशुद्धावस्थेतच पीडितेवर बलात्कार केला आहे. या प्रकारानंतर आरोपीनं तिला लग्नाचं आमिष दाखवत हे प्रकरण मिटवलं. तसेच 10 ऑक्टोबर रोजी आरोपी पुन्हा पीडितेच्या घरी आला. तिच्याच घरी राहत त्याने 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान तिच्यावर वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केले.
हेही वाचा-खाऊ आणायला गेलेल्या चिमुकलीवर दुकानदाराकडून लैंगिक अत्याचार; कोल्हापुरातील घटना
त्यातूनच पीडित तरुणी गर्भवती राहिली. हे समजल्यावर आरोपीनं तिला टाळाटाळ करायला सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करत लग्न करणार नसल्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर, पीडित तरुणीनं थेट मुंढवा पोलीस ठाण्यात जात, आरोपी नदीम शेख याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांन विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Rape