मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

टोळक्यानं अपहरण करत 4 दिवस ठेवलं डांबून अन्..; पुण्याला हादरवणारी घटना

टोळक्यानं अपहरण करत 4 दिवस ठेवलं डांबून अन्..; पुण्याला हादरवणारी घटना

Crime in Pune: पुण्यातील सहा जणांच्या टोळीनं एका तरुणाचं अपहरण करून त्याला चार दिवस डांबून ठेवल्याचा (young man kidnapped and made hostage for 4 days) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Crime in Pune: पुण्यातील सहा जणांच्या टोळीनं एका तरुणाचं अपहरण करून त्याला चार दिवस डांबून ठेवल्याचा (young man kidnapped and made hostage for 4 days) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Crime in Pune: पुण्यातील सहा जणांच्या टोळीनं एका तरुणाचं अपहरण करून त्याला चार दिवस डांबून ठेवल्याचा (young man kidnapped and made hostage for 4 days) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 15 जानेवारी: गेल्या काही काळात पुण्यात (Pune) गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात चोरी, खून, दरोडे, अपहरण, बलात्कार आणि विनयभंगाच्या अनेक घटना समोर येत आहेत. यानंतर पुण्यात आणखी एक अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. येथील सहा जणांच्या टोळीनं एका तरुणाचं अपहरण करून त्याला चार दिवस डांबून ठेवल्याचा (young man kidnapped and made hostage for 4 days) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी तरुणाला डांबून ठेवल्यानंतर त्याला बेदम मारहाण (beating) देखील केल्याचा आरोपी पीडित तरुणाने केला आहे.

या प्रकरणी पीडित तरुणाने सिंहगड पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अपहरण आणि मारहाणीसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या (2 Arrested) आहेत. सनी सुनील छजलाणी (31, मुंढवा) आणि सलमान उर्फ उमर समीर शेख (24, अप्पर इंदिरानंगर) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी मोशी येथील रहिवासी असणाऱ्या 31 वर्षीय राहूल चव्हाण यानं फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा-साताऱ्यात अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य, ब्लॅकमेल करत सुरू होता धक्कादायक प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी छजलाणी याने काही दिवसांपूर्वी फिर्यादी राहूल चव्हाण आणि त्याचा भाऊ गोविंद चव्हाण यांना व्यवसायासाठी काही पैसे उसने दिले होते. हे पैसे परत न दिल्याच्या कारणातून आरोपी आणि फिर्यादीमध्ये वादाला सुरुवात झाली होती. दरम्यान 10 जानेवारी रोजी फिर्यादी राहुल हा सिंहगड कॅम्पस परिसरातील क्युबाना कॅफे परिसरात आला होता. यावेळी याठिकाणी आरोपी सनी आपल्या काही साथीदारांना घेऊन याठिकाणी आला.

हेही वाचा-हातावर पोट असणाऱ्या जोडप्यानं गमावलं लेकरू, 2 वेळच्या अन्नासाठी झगडताना झाला अंत

येथे आरोपींनी राहुलला बेदम मारहाण केली, त्यानंतर सर्वांनी जबरदस्ती करत राहुल याचं अपहरण केलं. आरोपी त्याला सनीच्या घरी घेऊन गेले. याठिकाणी राहुलला डांबून ठेवण्यात आलं तसेच बेदम मारहाण करण्यात आली. तसेच पैसे न दिल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही आरोपींनी दिली. या धक्कादायक प्रकारानंतर आरोपींनी 14 जानेवारी रोजी पीडित तरुण राहुल चव्हाण याची सुटका केली. सुटका झाल्यानंतर राहुल याने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, अन्य चार जणांचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Kidnapping, Pune