मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पोलीस चौकीत तरुणाचा तुफान राडा; अधिकाऱ्यालाही केली मारहाण, पुण्यातील घटना

पोलीस चौकीत तरुणाचा तुफान राडा; अधिकाऱ्यालाही केली मारहाण, पुण्यातील घटना

Crime in Pune: वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातल्याने पोलीस चौकीत नेलेल्या तरुणाने पोलीस चौकीत खुर्च्यांची फेकाफेक करत तुफान राडा घातला आहे.

Crime in Pune: वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातल्याने पोलीस चौकीत नेलेल्या तरुणाने पोलीस चौकीत खुर्च्यांची फेकाफेक करत तुफान राडा घातला आहे.

Crime in Pune: वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातल्याने पोलीस चौकीत नेलेल्या तरुणाने पोलीस चौकीत खुर्च्यांची फेकाफेक करत तुफान राडा घातला आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 05 डिसेंबर: वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातल्याने (Hassle with traffic police) पोलीस चौकीत नेलेल्या तरुणाने पोलीस चौकीत खुर्च्यांची फेकाफेक करत तुफान राडा घातला आहे. आरोपी तरुणानं पोलीस चौकीतील पोलीस अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालत त्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण आणि शिवीगाळ (Young man beat and abused police officer) देखील केली आहे. शनिवारी रात्री कात्रज पोलीस चौकीत हा प्रकार घडल्यानंतर, आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामांत अडथळा आणण्याच्या कलमाअंतर्गत हा गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून आरोपी तरुणाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

हर्षल बापूराव रोहिले असं अटक करण्यात आलेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव असून तो पुण्यातील चिखली परिसरातील रहिवासी आहे. याप्रकरणी वाहतूक विभागातील पोलीस शिपाई गणेश सर्जेराव नरुटे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरुटे हे वाहतूक विभागात कार्यरत असून घटनेच्या दिवशी कात्रज चौकात ड्युटीवर होते.

हेही वाचा-गोड बोलून घरी नेलं अन्..; कोल्हापुरात जावयानं सासऱ्याचा खून करून दगडाखाली गाडलं

यावेळी आरोपी हॉर्न वाजवत भरधाव वेगाने कार चालवताना दिसला. यावेळी नरुटे याने आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कार न थांबवता तसाच पुढे निघून गेला. त्यामुळे नरुटे यांनी अन्य वाहतूक पोलिसांच्या मदतीने आरोपी तरुणाची कार थांबवली. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली असता, त्याने पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली.

हेही वाचा-LLB अर्धवट सोडून सुरू केला भलताच उद्योग; 12 महिलांना जाळ्यात ओढणारा भामटा जेरबंद

तुम्हाला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही, तुला बघून घेईल अशी धमकी आरोपीनं दिली. तसेच तो वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून गेला. या प्रकारानंतर संबंधित तरुणाला वाहतूक पोलिसांनी कात्रज चौकीत आणलं. याठिकाणीही तरुणानं पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. तसेच यावेळी आरोपीनं पोलीस निरीक्षक गौरव देव यांच्या अंगावर धावून जात, त्यांना मारहाण केली आहे. या प्रकारानंतर वाहतूक विभागातील पोलीस शिपाई गणेश सर्जेराव नरुटे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune