Home /News /maharashtra /

मावळ हळहळलं, मैत्रिणीसोबत फिरायला आली, नयनरम्य दृश्य पाहून भारावली, इंद्रायणी काठी पाय घसरला आणि...

मावळ हळहळलं, मैत्रिणीसोबत फिरायला आली, नयनरम्य दृश्य पाहून भारावली, इंद्रायणी काठी पाय घसरला आणि...

पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी परिसरातून ती मैत्रिणी सोबत फिरायला आली होती. नदीपात्राच्या बाजूने फिरत असताना पाय घसरून ही तरुणी पडली.

    पुणे, 6 जुलै : सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत (Rain in Maharashtra) असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसामुळे निर्सगाचे सौंदर्य खुलले आहे. (Nature in Rain) यामुळे अनेक जण पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. मात्र, यातच एक वाईट बातमी समोर आली आहे. मैत्रिणीसोबत पर्यटनासाठी आलेली तरुणी नदी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. (Girl Died in Indrayani River) काय आहे संपूर्ण घटना - मैत्रिणीसोबत पर्यटनासाठी आलेली तरुणी नदी वाहून गेली आहे. ही घटना मावळ-कुंडमळा परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात घडली. साक्षी सतीश वंजारे, असे वाहून गेलेल्या तरुणीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी परिसरातून ती मैत्रिणी सोबत फिरायला आली होती. नदीपात्राच्या बाजूने फिरत असताना पाय घसरून ही तरुणी पडली आणि इंद्रायणी नदी पात्रात वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच, एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर बुडालेल्या तरुणीला वन्यजीव रक्षक मावळच्या पथकाने शोध घेतला. मात्र, अंधार पडल्याने ही शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. यानंतर उद्या गुरुवारी सकाळी पुन्हा तरुणीचा शोध घेण्यात येणार आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. हेही वाचा - पुण्यात दिवसा घरफोडी करुन 60 तोळे सोन्याची चोरी; बहिणीच्या घरात फ्रिजखाली लपवले दागिने, अशी झाली पोलखोल
    दोन दिवसांपूर्वी नागपुरातही घडली धक्कादायक घटना - 
    नागपुरातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थी आऊटिंग करायला गेले होते. (Two Students death in Ambazari Lake) मात्र, त्यांचा नागपुरातील अंबाझरी तलावात (Ambazari lake nagpur) बुडून मृत्यू झाला. मिहीर उके व चंद्रशेखर वाघमारे हे रविवारी दुपारी अंबाझरी तलावाजवळ फिरायला गेले होते. त्यांच्यासोबत अक्षय मेश्राम व प्रशिक भिडे हे त्यांचे दोन मित्रही होते. अंबाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर चिखलाने चपला खराब झाल्या होत्या. त्यामुळे आपल्या चपला धुण्यासाठी हे चौघे तलावातील पाण्याजवळ गेले. याचवेळी मिहीर व चंद्रशेखर तलावातील पायऱ्यांवर उतरले असता त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. यावेळी पाण्याची खोली जास्त होती. त्याचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे ते बुडाले. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना वर येता आले नाही. यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Death, Pune

    पुढील बातम्या