पुणे, 03 डिसेंबर : पुणे महापालिका निवडणुकीच्या (pune municipal corporation election 2022) तोंडावर राजकीय वारे वाहू लागले आहे. पुण्यात भाजप कार्यालयाच्या (pune bjp office) उद्घाटनानिमित्ताने भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी सावरकरांच्या मुद्यावरून शिवसेनेवर (shivsena) निशाणा साधला. 'यापूर्वी आपल्यासोबत असलेले आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. जे रोज उठून सावरकरांचा अपमान करतात. अरे निर्लज्जांनो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जे सावरकरांचं नाव घेत होते' असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले
पुणे महापालिकेची निवडणूक अगदी तोंडावर आलं असताना भारतीय जनता पक्षाने महापालिका इमारतीशेजारी नवं कार्यालय उभारलं आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
'हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत, होय आम्ही सावरकरवादी आहोत. हे आम्ही ठणकावून सांगणार. पण यापूर्वी आपल्यासोबत असलेले आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. जे रोज उठून सावरकरांचा अपमान करतात. अरे निर्लज्जांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जे सावरकरांचं नाव घेत होते, अशी टीका फडणवीस यांनी केली.
IPL 2022 : अहमदाबाद-लखनऊच्या टीम या 6 खेळाडूंना लिलावाआधीच विकत घेणार!
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात लस तयार झालं नसतं तर विचार करा आज काय झालं असतं. काल मविआ सरकार सांगत होतं आम्ही 10 कोटी लशी दिल्या. अरे मोदींनी लशी दिल्या नसत्या तर तुम्हा काय दिलं असतं. इंग्लडच्या पीएमने मोदींचं कौतुक केलंय. एकीकडे मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय आणि महाराष्ट्रात फक्त वसुली सुरू आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
'पुणे मनपात सत्तेत असताना भाजपने पुणेकरांची सेवा केली. कोविड काळात फक्त भाजप कार्यकर्ता रस्त्यावर उतरून सेवा देत होता. भाजप ही फक्त निवडणुका जिंकण्याचं मशीन नाहीये तर सेवा करणारी पार्टी आहे, पुणेकरांच्या मनामनात फक्त भाजप आहे,पुढच्या 25 वर्षांचे नियोजन डोळ्यासमोर ठेऊन विकास करतोय, असंही फडणवीस म्हणाले.
Rice with Roti : तुम्हीही जेवणात चपाती आणि भात एकत्र खाता का? असा होऊ शकतो त्रास
आज पुण्याची मेट्रो असेल, पिण्याची पाण्याची योजना पुण्यात शिवसेना नावालाही उरली नाही आणि राष्ट्रवादी ही तर भ्रष्टवादी पार्टी हे म्हणूनच पुणेकर आमच्याच पाठीमागे उभे राहतील, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.
'मला पत्रकरांनी विचारलं हे शक्तीप्रदर्शन आहे तर. मी उत्तरलो हा फक्त उत्साह आहे. भाजपने शक्तीप्रदर्शन करायचं ठरवलं तर पुण्यातली सर्वच मैदानं कमी पडतील. यापुढे भाजपच्या कार्यक्रमात प्रदुषण करणारे फटाके वाजवू नका, असं म्हणत आतषबाजीवर फडणवीस यांची कार्यकर्त्यांना सूचना केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.