मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING: योगेश जगताप हत्या प्रकरण; पिंपरी परिसरात गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक

BREAKING: योगेश जगताप हत्या प्रकरण; पिंपरी परिसरात गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक

आरोपी अश्विन चव्हाण आणि गणेश माटे...

आरोपी अश्विन चव्हाण आणि गणेश माटे...

Crime in Pimpri: काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड परिसरात दिवसाढवळ्या योगेश जगताप नावाच्या एका व्यावसायिकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या (Yogesh jagtap brutal murder) करण्यात आली होती.

  • Published by:  News18 Desk

पिंपरी, 27 डिसेंबर: काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड परिसरात दिवसाढवळ्या योगेश जगताप नावाच्या एका व्यावसायिकाची गोळ्या झाडून (Gun firing) निर्घृण हत्या (Yogesh jagtap brutal murder) करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरही आरोपींनी गोळीबार (Gun firing at police) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकण परिसरात गुन्हेगार आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक घडली आहे. स्व संरक्षणासाठी पोलिसांनी देखील आरोपींवर गोळीबार केला आहे.

गोळीबाराच्या थरारनंतर पोलिसांनी गणेश माटेसह महेश माने आणि अश्विन चव्हाण या तिघांना जेरबंद केलं (3 Accused arrested) आहे. संबंधित तिघेही योगेश जगताप यांची हत्या करून फरार झाले होते. अखेर त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपींना पकडायला गेलेल्या पोलिसांवर गणेश माटे यानं गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा-पत्नीचे नोकरासोबत अवैध संबंध; संतापलेल्या व्यावसायिकाची विष खाऊन आत्महत्या

पिंपळे गुरव परिसरातील काटेपूरम चौकात शनिवारी (18 डिसेंबर) सकाळी भर चौकात योगेश रवींद्र जगताप (वय 36, रा. पिंपळे गुरव) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी याआधीच गणेश बाजीराव ढमाले आणि अक्षय केंगले नावाच्या दोन संशयित आरोपींना अटक केली होती. गेल्या आठ दिवसांपासून पोलीस अन्य मुख्य आरोपींच्या मागावर होते. त्यानंतर गोळाबाराच्या चकमकीनंतर पोलिसांनी तीन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या चकमकीत पोलिसांकडून देखील गोळीबार करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन राऊंड फायर केले आहेत.

हेही वाचा-संशयी पत्नीचं विकृत कृत्य; पतीला गावातील अल्पवयीन मुलीवर करायला लावला बलात्कार

आरोपींची सोशल मीडियावर दहशत

योगेश जगताप खून प्रकरणातील मुख्य आरोपी अश्विन चव्हाण आणि गणेश माटे यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर पिस्तूल हातात घेऊन स्टेटस ठेवलं होतं. ज्यामध्ये बॅकग्राउंडला दहशत पसरवणारे  डायलॉग देखील जोडण्यात आले आहेत. आरोपींनी या व्हिडीओतून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. असं असतानाही त्यांच्या स्टेटसला अनेकांनी लाईक आणि कमेंट्स केले आहेत. त्याच्या स्टेटसला लाईक आणि कमेंट करणाऱ्यांची सर्व माहिती पोलिसांच्या सायबर सेलकडून संकलित करण्यात येत आहे.

First published:

Tags: Crime news, Gun firing, Murder, Pimpri chinchawad