लग्नानंतरही सुरू राहिलं प्रेमप्रकरण; वाचा, महिलनेचे प्रियकराच्या मदतीने पतीसोबत काय केलं?
लग्नानंतरही सुरू राहिलं प्रेमप्रकरण; वाचा, महिलनेचे प्रियकराच्या मदतीने पतीसोबत काय केलं?
नाशिकच्या मालेगाव (Malegaon) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनैतिक प्रेम (Immoral Relationship) संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काटा काढला आहे. प्रियकराच्या मदतीने तिने झोपेत असलेल्या आपल्या पतीचा गळा दाबून निर्घृण खून केला आहे. (Wife Killed Husband)
मनमाड, 20 मे : नाशिकच्या मालेगाव (Malegaon) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनैतिक प्रेम (Immoral Relationship) संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काटा काढला आहे. प्रियकराच्या मदतीने तिने झोपेत असलेल्या आपल्या पतीचा गळा दाबून निर्घृण खून केला आहे. (Wife Killed Husband) मालेगावच्या टाकळी येथे ही धक्कादायक घटना घडली. दीपक सूर्यवंशी असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेच्या अवघ्या काही तासातंच पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी दीपकचा रोहिणीसोबत विवाह झाला होता. मात्र, रोहिणीचे लग्नाअगोदर रविंद्र पवार या तरुणासोबत प्रेम संबंध होते. लग्नानंतर देखील दोघांचे प्रेम संबंध कायम होते. या प्रेमाच्या मार्गात पती अडसर ठरत होता. त्यामुळे रोहिणीने प्रियकर रवींद्रच्या मदतीने पतीचा खून केला. खून केल्यानंतर प्रियकर रवींद्र फरार झाला होता. तर रोहिणीने पतीचा अचानक मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र, अवघ्या काही तासात पोलिसांनी हा बनाव उघड करून दोघांना अटक केली.
हेही वाचा - भाच्याचा मामीवर जडला जीव, प्रेमाच्या धुंदीत असा काढला मामाचा काटा; 9 महिन्यांनंतर आलं समोर
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. यानंतर अवघ्या काही तासात पत्नी रोहिणी आणि तिचा प्रियकर रवींद्र पवार या दोघां संशयितांना अटक केली. या दोन्ही आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
विवाहबाह्य संबंधातून गुन्हा घडण्याची आणखी एक बातमी समोर आलीय. बिहारमध्ये एका पतीनं आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं कळाल्यावर गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. तपासादरम्यान, पोलिसांना एक सुसाईड नोट (Suicide Note) सापडली. या सुसाईड नोटमध्ये या व्यक्तीनं आपल्या आत्महत्येचं कारण नमूद केलं होतं. ते कारण वाचून त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. चंद्रदेव कुमार असं मृत व्यक्तीचं नाव असून ते नालंदा (Nalanda) जिल्ह्यातील लहेरी परिसरात राहायचे. त्यांनी 16 मे 22 रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.