मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचं सुप्रिया सुळेंकडून 'प्रमोशन', राष्ट्रवादी शिवतिर्थावर जाणार? पवार म्हणतात...

ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचं सुप्रिया सुळेंकडून 'प्रमोशन', राष्ट्रवादी शिवतिर्थावर जाणार? पवार म्हणतात...

 'मला अजिबात आश्चर्य वाटत नाही, हा निर्णय होईल याची मला खात्री होती. अगदी निर्णय कोण...

'मला अजिबात आश्चर्य वाटत नाही, हा निर्णय होईल याची मला खात्री होती. अगदी निर्णय कोण...

दसरा मेळाव्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवतिर्थावर होणार आहे. या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस जाणार का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Shreyas

पुणे, 3 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात तर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या शिवतिर्थावर होणार आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून या दसरा मेळाव्याचे वेगवेगळे ट्रेलर लॉन्च करण्यात येत आहेत. यातलाच एक ट्रेलर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी रिट्वीट केला आहे.

पुण्यात झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा आणि राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर सहभाग नोंदवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. ''दसरा मेळावा हा शिवसेनेचा आहे, तो वेगळा पक्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना दसरा मेळावा घेत आहे. राष्ट्रवादी त्यात काही करणार नाही. तसंच राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे, त्यांचे नेते यात सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये पडणार नाही,' असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'राज्यात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत. पण त्यामुळे राज्यातल्या राजकीय वातावरण बिघडणार नाही. याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी, आमच्यासारख्या वरिष्ठ मंडळीनाही सांगावं. आता दसरा मेळाव्याला ज्या भूमिका मांडतील त्याने कटुता वाढणार नाही हे पाहावं', असा सल्लाही शरद पवारांनी शिंदे गट आणि शिवसेनेला दिला.

शिंदेंकडून 2014 लाच 'महाविकासआघाडी'ची ऑफर, अशोक चव्हाणांचा दावा, पण पवारांनीच काढली हवा?

First published:

Tags: NCP, Shivsena, Uddhav Thackeray