मुंबई, 31 जानेवारी: राज्यातल्या हवामानासंदर्भातली (Weather in State) मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या थंडीची लाट (Cold Wave) आहे. मात्र थंडीची लाट असली तरी काही दिवसात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दिवसात राज्यातल्या काही भागात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
सध्या काही भागात थंडी आहे. त्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी आणि धुक्याचं साम्राज्य आहे. त्यामुळे येत्या 2 फेब्रुवारीपर्यंत असंच वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. तर 3 फेब्रुवारीपासून वातावरण ढगाळ राहील आणि पावसाची शक्यता आहे, असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.
दोन गोळ्या लागूनही दहशतवाद्यांवर तुटून पडले IAF गरूडचे कमांडो, पुलवामा एन्काऊंटरची Inside Story
राज्यातल्या या जिल्ह्यांमध्ये हुडहुडी
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर कमी होईल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून थंडीची लाट सुरु आहे.
राज्यातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा अजूनही निच्चांकी पातळीवर आहे. धुळ्यात 4.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली गेली. नंदुरबारच्या सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये पारा 10 अंशाच्या खाली आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathwada, Rain