Home /News /maharashtra /

2500 च्या लाचेने लावली आयुष्याची वाट, पुण्यात ACB ने भ्रष्टाचारी अभियंत्यांच्या मुसक्या आवळल्या

2500 च्या लाचेने लावली आयुष्याची वाट, पुण्यात ACB ने भ्रष्टाचारी अभियंत्यांच्या मुसक्या आवळल्या

या प्रकरणातील आरोपींचे नाव किरण अरुण शेटे (वय - ३१, पद- उप अभियंता यांत्रिकी वर्ग -१) आणि परमेश्वर बाबा हेळकर, (वय -४९ पद- शाखा अभियंता वर्ग -२), असे आहे.

  पुणे, 6 जुलै : पुण्यातून (Pune) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी पाणीपुरवठा विभागाच्या दोन अभियंते लाचलुचपत विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकले आहेत. 2500 रुपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे. (Pune Bribe News)

  काय आहे संपूर्ण प्रकरण - या प्रकरणातील आरोपींचे नाव किरण अरुण शेटे (वय - ३१, पद- उप अभियंता यांत्रिकी वर्ग -१) आणि परमेश्वर बाबा हेळकर, (वय -४९ पद- शाखा अभियंता वर्ग -२), असे आहे. लाचलुचपत विभागाने बुधवारी 6 जुलैला सापळा रचून कारवाई करत या लाचखोर अभियंत्यांना रंगेहात पकडले. यातील तक्रारदार लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनी शिवेगाव ता. खेड येथील अंगणवाडीच्या इलेक्ट्रिक व वॉटर प्युरीफायरच्या कामाच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी देण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडे मागणी केली होती. तर आरोपी लोकसेवक शेटे व हेळकर यांनी तक्रारदाराकडे अंदाजपत्रकाच्या 2% रकमेची लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदार विभागाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली असता लाचलुचपत विभागाने सापळा रचला. त्यानंतर आरोपी लोकसेवक हेळकर याने 2500 रुपये स्विकारले. यावेळी त्याला रंगेहात पकडण्यात आले. हेही वाचा - पुण्यात दिवसा घरफोडी करुन 60 तोळे सोन्याची चोरी; बहिणीच्या घरात फ्रिजखाली लपवले दागिने, अशी झाली पोलखोल ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर, पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोकॉ भूषण ठाकूर, पोकॉ दिनेश माने, मपोकॉ पूजा पागिरे, चालक पोकॉ चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Pune

  पुढील बातम्या