Home /News /maharashtra /

वारकरी संप्रदायातील खळबळजनक बातमी, देहू संस्थानचे आजी-माजी विश्वस्त जुगार खेळताना रंगेहात अटकेत

वारकरी संप्रदायातील खळबळजनक बातमी, देहू संस्थानचे आजी-माजी विश्वस्त जुगार खेळताना रंगेहात अटकेत

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या संस्थानचे आजी-माजी विश्वस्त थेट जुगार खेळताना रंगेहात अटकेत आलेत.

    गणेश दुडम, पिंपरी चिंचवड, 3 ऑगस्ट : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या संस्थानचे आजी-माजी विश्वस्त थेट जुगार खेळताना रंगेहात अटकेत आलेत. त्यांच्यासह देहू नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविकेच्या पतीसह सहवीस जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या कारवाईनंतर वारकरी सांप्रदायामध्ये एकच खळबळ उडाली आहे. चाकण एमआयडीसी हद्दीत जुगार अड्डा सुरु असल्याची खबर दरोडा विरोधी पथकाला मिळाली होती. देहूगाव ते येलवाडी मार्गावरील एक बंदावस्थेत कंपनी आहे. त्या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर हा पत्त्यांचा खेळ रंगला होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी याची खातरजाम केली आणि त्यानुसार मंगळवारच्या रात्री सापळा रचला. एका मागोमाग एक असे 26 जण कंपनीत दाखल झाले. सर्वांच्या हातात पत्ते पडू लागले, नोटांची बंडलं खुलू लागली, डाव मारणारे आनंदी तर पैसा डुबणारे नाराजीत होते. तितक्यात पोलिसांनी तिथं छापा टाकला अन सर्वानाच धक्का बसला. (औरंगाबादमध्ये हॉटेलच्या रुममध्ये प्रेमीयुगुल आढळलं धक्कादायक अवस्थेत! 29 जुलैपासून होतं वास्तव्य) पोलिसांनी रचलेल्या सापळ्यातून कोणालाच निसटता आलं नाही. पोलिसांनी सर्वांची माहिती घ्यायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. कारण या 26 जणांमध्ये देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विशाल केशव मोरे, माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरेही जुगार खेळत होते. त्यांच्यासह देहू नगरपरिषदेचे नगरसेवक मयूर टिळेकर, एका नगरसेविकेचे पती विशाल परदेशी यांचाही समावेश आहे. अटकेत असलेल्या 26 जणांकडून 35 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. दरम्यान, जुगार खेळणाऱ्यांमध्ये देहू संस्थानचे आजी-माजी विश्वस्त सापडल्याने वारकरी सांप्रदायामध्ये एकच खळबळ उडालेली आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या