मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : पुण्यात वाहतूक कोंडीची परिसीमा; सकाळपासून मोठी गर्दी, प्रवाशांचा संताप

Video : पुण्यात वाहतूक कोंडीची परिसीमा; सकाळपासून मोठी गर्दी, प्रवाशांचा संताप

नियमानुसार, गाड्यांना टोल माफ करणार का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

नियमानुसार, गाड्यांना टोल माफ करणार का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

नियमानुसार, गाड्यांना टोल माफ करणार का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

    पुणे, 13 ऑगस्ट : कार्यालयांना सलग सुट्ट्या आल्यामुळे पुढील तीन दिवस पर्यटनस्थळी मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. आज सकाळपासूनच पुणे-नाशिक महामार्गावर मोठ्या वाहतूक कोंडींचा सामना करावा लागला. त्यातच पुणे शहरातही नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे एक व्हिडीओ समोर आले आहेत. अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणांमध्ये बिघाड आणि खड्ड्यांच्या समस्येमुळे आधीच वाहतुकीला ब्रेक लागत आहे. त्यात आता सुट्टी सेलिब्रेट करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचा अधिकांश वेळ हा वाहतुकीतच जात असताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने भिडे पुल पाण्याखाली गेला. त्यात दोन्ही बाजूचे रस्तेही बंद असल्याने त्याचा ताण इतर रस्त्यांवर पडून वाहतूककोंडी पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक पोलीसही कमी पडत आहे. पुणे एक्सप्रेस मार्गावर तर रात्रीच्या वेळेत अनेक तास प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले होते. यावेळी कोंडी सोडविण्यासाठी पुरेसे पोलीस नसल्याचाही आरोप केला जात आहे. पुण्यातील मुंडवा परिसरातही हेच चित्र आहे. याबाबत एका नागरिकांना ट्विट करीत व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय तळेगाव टोल आधीही वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. नियमानुसार, गाड्यांना टोल माफ करणार का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mumbai pune expressway, Pune, Traffic

    पुढील बातम्या