आपल्या पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, "भले आज माझ्याकडे Audi ,BMW, इनोव्हा , harley Davidson आहे पण त्यामध्ये बसण्यासाठी मला त्या सायकलवर घेऊन फिरणारा वाघासारखा माझा बाप आज नाही. म्हणून ही सायकल मी अजून जपून ठेवली आहे." मनसेतला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, वसंत मोरे भडकले पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. 15 मे रोजीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यात मेळावा आयोजित केला होता. पण कार्यक्रमाच्या पत्रिकेत मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या नावाचा उल्लेख नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा वसंत मोरे यांना डावलल्याचा प्रकार समोर आला. यावर वसंत मोरे यांनीही प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली होती. वाचा : राज्यसभा उमेदवारीच्या संदर्भात संभाजीराजेंनी केली मोठी घोषणा वसंत मोरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत त्यांनी हे प्रकरण मनसेच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत नेलं. रात्री उशीरा माझ्या हातात कार्यक्रम पत्रिका आली. या कार्यक्रम पत्रिकेत 11 जणांची कोअर कमिटी आहे पण प्रत्यक्षात 11 जणांची नावं आहेत, त्यामध्ये माझं नाव नाही. हा विषय मुद्दाम केला गेला आहे. अशा कार्यक्रमातून मला लांब ठेऊन राज साहेबांच्या मनात माझ्याविषयी राग निर्माण झाला पाहिजे म्हणून अशा गोष्टी केल्या जात आहेत, अशा शब्दांत वसंत मोरेंनी आपला राग व्यक्त केला.भले आज माझ्याकडे Audi ,BMW, इनोव्हा , harley Davidson आहे पण त्यामध्ये बसण्यासाठी मला त्या सायकलवर घेऊन फिरणारा वाघासारखा माझा बाप आज नाही. म्हणून ही सायकल मी अजून जपून ठेवली आहे.
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) May 26, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.