पुणे, 04 डिसेंबर: गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पुण्यातून एका अट्टल मोबाइल चोराला अटक (Mobile theft arrest) केली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता, अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून 38 महागडे मोबाइल फोन आणि एक कार जप्त केली (38 stolen mobile and one car seized) आहे. आरोपी हा मूळचा आंध्र प्रदेशातील रहिवासी असून त्याच्या टोळी महाराष्ट्रासह कर्नाटकात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.
नागेश आप्पाना असं अटक करण्यात आलेल्या 25 वर्षीय मोबाइल चोरट्याचं नाव असून तो आंध्र प्रदेशातील गतकुल जिल्ह्याच्या गुत्ते तालुक्यातील रहिवासी आहे. आरोपी आपल्या टोळीसह हैदराबादहून पुण्यात कारने येत असत. पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत आरोपी प्रवाशांचे मोाबाइल गायब करत होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आरोपींचा हा खेळ सुरू होता.
हेही वाचा-..अन् चिमुकल्या बहीण-भावाचं हरपलं विश्व; शेतकरी दाम्पत्याने केला हृदयद्रावक शेवट
दरम्यान, पीएमपीएल बसमध्ये चोरी करण्यासाठी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकची एक टोळी आल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अधारे अमली पदार्थविरोधी पथकाने स्वारगेट परिसरात उभ्या असलेल्या एका इरटिगा कारची झडती घेतली. यावेळी गाडीत एकूण 38 महागडे फोन आढळले आहेत. पोलिसांनी सर्व मोबाइल आणि कार जप्त केली आहे. एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.
हेही वाचा-Beed: पत्नीचे शेजाऱ्यासोबत होते अनैतिक संबंध; कंटाळलेल्या पतीनं उचललं भयावह पाऊल
संबंधित मोबाइल चोरटे पीएमपीएल बसमधील प्रवाशांचे मोबाइल चोरण्यासाठी खास अंडरवेअरचा वापर (Use of special underwear to steal mobiles) करत होते. गर्दीत प्रवाशाचा मोबाइल चोरल्यानंतर तो मोबाइल चोरटे आपल्या अंडरवेअरमध्ये लपवत असायचे. त्यामुळे त्यांची झडती घेतली तरी मोबाइल हाती लागत नव्हते. आरोपींचा हा प्रताप पाहून पोलीस देखील हैराण झाले आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, संबंधित चोरट्याच्या अंडरवेअरला मोठे खिशे आहेत. या खिशामध्ये चार ते पाच मोबाइल सहज बसतात, अशा प्रकारे ही अंडरवेअर शिवण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune