पिंपरी, 08 जानेवारी: पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या पिंपरी (Pimpri) परिसरात एका विवाहित महिलेला अश्लील व्हिडीओ (Porn video) दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural sex with wife) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आरोपी पतीकडून हा भयंकर प्रकार सुरू होता. या प्रकरणी अखेर पीडित महिलेनं देहूरोड पोलीस ठाण्यात धाव घेत, पतीसह सासू, दीर आणि नणंद यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घरगुती हिंसाचारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहे.
याप्रकरणी शुक्रवारी पीडित विवाहितेनं देहूरोड पोलीस ठाण्यात पतीसह सासू, दीर आणि नणंद यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आरोपींनी पीडित विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोपी पीडितेनं केला आहे. तसेच फिर्यादीला काळी, बुटकी असं बोलून सतत टोमणे दिले आहेत. तसेच लग्नात सोनं कमी दिल्याच्या कारणातून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोपी पीडितेनं आपल्या तक्रारीत केला आहे.
हेही वाचा-एकतर्फी प्रेमातून पुण्यातील डॉक्टरने हद्द केली पार; कांड वाचून बसेल धक्का
तसेच सासू आणि नणंद यांनी पीडित महिलेचे डोक्यावरील केस पकडून मारल्याचंही पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर पीडित महिलेच्या पतीने तिला पॉर्न व्हिडीओ दाखवून तिची इच्छा नसताना, अनैसर्गिक शरीर संबंध ठेवले आहेत. संबंधित धक्कादायक प्रकार 28 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर दरम्यान नाशिक येथील देवळाली कॅम्प येथे घडला आहे. आरोपींनी पीडितेला नरक यातना दिल्या आहेत.
हेही वाचा-नाशकातील जंगलात 10 वर्षीय मुलीसोबत सुरू होता भयंकर प्रकार; ऐनवेळी गुराखी आला अन्
अखेर आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं शुक्रवारी 7 जानेवारी रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पतीसह सासू, दीर आणि नणंदेविरोधात घरगुती हिंसाचारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Rape