मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बोलताना तारतम्य बाळगाल की नाही? राज्यपालांच्या वक्तव्यावर उदयनराजेंचा संताप; पवार, गडकरींनाही केला सवाल! 

बोलताना तारतम्य बाळगाल की नाही? राज्यपालांच्या वक्तव्यावर उदयनराजेंचा संताप; पवार, गडकरींनाही केला सवाल! 

उदयनराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

उदयनराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

उदयनराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India
  • Published by:  Ajay Deshpande

पुणे, 24 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. उदयनराजे यांनी देखील राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. बोलताना जरा तारतम्य बाळगाल की नाही? असा सवाल करत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

नेमकं काय म्हणाले उदयनराजे?

उदयनराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. बोलताना तारतम्य बाळगाल की नाही? छत्रपती शिवाजी महाराज गुलामगिरीविरोधात लढले. लोकशाही ही शिवरायांची संकल्पना होती. बाकीचे राजे साम्रराज्य विस्तारासाठी लढले. मात्र शिवरायांचा लढा हा सर्वसामांन्यासाठी होता. मग छत्रपती शिवरायांचे विचार जुने कसे होऊ शकतात? असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.

राज्यपालांना हटवण्याची मागणी

तसेच यावेळी उदयनराजे यांनी राज्यपालांना हटवण्याची देखील मागणी केली आहे. आपण याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहीलं आहे. कोश्यारी यांना अडीच वर्ष महाराष्ट्रात राहुन देखील महाराज कळाले नाहीत. ते राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिसळवत आहेत. त्यामुळे त्यांना राज्यपालपदावरून हटवण्यात यावे अशी मागणी या पत्रकार परिषदेमध्ये उदयन राजे यांनी केली आहे.

'पवार, गडकरींनी निषेध का केला नाही'? 

दरम्यान यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील टोल लगावला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शरद पवार यांच्यासमोर असं वक्तव्य केलं. मग तेव्हा शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध का केला नाही असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे.

First published:

Tags: Udayanraje