मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बाबांनी आणलेला खाऊ आवडीने खाल्ला; दुसऱ्याच दिवशी दोन्ही चिमुरडींचा मृत्यू, गावात हळहळ!

बाबांनी आणलेला खाऊ आवडीने खाल्ला; दुसऱ्याच दिवशी दोन्ही चिमुरडींचा मृत्यू, गावात हळहळ!

भक्ती आबासाहेब चव्हाण ( वय- 6) व नम्रता आबासाहेब चव्हाण ( वय-4) या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पंढरपूर, 24 डिसेंबर : पंढरपूर (Pandharpur News) येथील मरवडे येथून एक धक्कादायक वृत्त (Shocking News) समोर आलं आहे. पंढरपुरातील मरवडे येथे विषबाधेने दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मयत मुलीचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहे. भक्ती आबासाहेब चव्हाण ( वय- 6) व नम्रता आबासाहेब चव्हाण ( वय-4) या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (Two small girls have died due to poisoning at Marwade in Pandharpur)

लहान मुलींसाठी मंगळवेढा येथील एका दुकानातून खाऊ आणला होता. खाऊ आणल्यानंतर मुलीही खूश झाल्या. सर्वांनी मिळून खाऊ खाल्यानंतर चव्हाण कुटुंबातील सर्वांनाच अस्वस्थ वाटू लागलं. यानंतर सर्वांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे मोठी मुलगी भक्ती हिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा-पतंग पकडण्याच्या शर्यतीत जीवनाची शर्यत हरला; नाशकात चिमुकल्याचा हृदयद्रावक शेवट

त्यानंतर काही वेळाने दुसरी मुलगी नम्रता हिचा मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात झाला त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत मुलीचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे. हा खाऊ कुठून आणला याबद्दल तपास केला जात आहे. दोन चिमुरड्यांच्या मृत्यूमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकरणानंतर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

First published:

Tags: Crime news, Pandharpur