मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुण्यात दोन बिबट्यांची झुंज; एकाचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक अनुभव

पुण्यात दोन बिबट्यांची झुंज; एकाचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक अनुभव

पुण्यात दोन बिबट्यांची झुंज; एकाचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक अनुभव

पुण्यात दोन बिबट्यांची झुंज; एकाचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक अनुभव

Leopard fight in junnar pune: पुण्यात दन बिबट्यांची झुंज झाली आहे. यामध्ये एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे.

जुन्नर, 18 डिसेंबर : जुन्नर तालुक्यात (Junnar Taluka Pune) अंगावर शहारा आणणारी एक घटना घडली ती म्हणजे समोरा समोर 2 बिबट्यांची झुंज (Two leopards fight) झाली. यामध्ये एका बिबट्याचा मृत्यू (One leopard died) झाला आहे. हा प्रकार काही शेतकऱ्यांनी पाहिला असून त्यांनी हा संपूर्ण प्रसंग सांगितला आहे. ही घटना आळेफाटा परिसरातील मुकाईमळा येथे 17 डिसेंबर रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास घडली आहे. (two leopards fight in Junnar taluka Pune)

जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावे बिबट प्रवण क्षेत्रात आहे. या गावांमध्ये बिबट्याची मोठी दहशत आहे. दिवसाढवळ्याही मोठ्या प्रमाणात बिबट्याचे दर्शन परिसरात होते. बिबट प्रवण क्षेत्र असल्याने बिबट्यांच्या संघर्षात वाढ झाली आहे.

आपल्या क्षेत्रात अधिराज्य असण्यासाठी अनेकदा दोन बिबट्यांमध्ये झटापट होते आणि यात कमकुवत बिबट्याचा मृत्यू होतो. शुक्रवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास आळेफाटा परिसरातील मुकाईमळा येथील शेतशिवारात स्थानिक शेतकरी उत्तम लाड यांनी दोन बिबट्यांची झुंज पहिली. त्यांना जो काही थरार अनुभवायला मिळाला तो शब्दांच्या पलिकडला होता. यामध्ये एका लहान अडीच ते तीन वर्षांच्या मादीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या शरीरावर जखमा होत्या. तसेच त्याचे पोट, मान व पायाचे लचके बिबट्याने तोडले होते. तर दुसऱ्या बिबट्याने शेजारील उसात धूम ठोकली.

वाचा : गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरलं; भरदिवसा तरुणावर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते डी. बी. वाळुंज घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. यावेळी त्याच्या समवेत बारकु गडगे, सुहास गडगे, संतोष गडगे, उद्धव लाड, उत्तम लाड उपस्थित होते.

दरम्यान जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांना परिसर अपुरा पडू लागले आहे. त्यातच उसाची तोडणी सुरु आहे अशावेळी बिबट्या आपला परिसर सुरक्षित करण्यासाठी इतर बिबट्यांशी लढतात. ही घटनादेखील याच प्रकारची असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नाशिकमध्ये बिबट्याला भिडली इवलीशी मांजर

बिबट्या अवघ्या काही सेकंदांतच आपल्या शिकारीवर झडप घेतो असं तुम्ही ऐकलं असेल. मात्र, काही दिवसांपूर्वी नाशिकमधील असा एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुम्हीही अवाक व्हाल. झालं असं की, मांजरीची शिकार करण्यासाठी बिबट्याने प्रयत्न केला. यावेळी मांजरीने त्याला चकवा दिला. यानंतर मांजर आणि बिबट्या दोघेही शेजारील विहिरीत पडले.

नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील कणकोरी गावातील ही घटना असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. रात्रीच्या वेळेस बिबट्या मांजरीची शिकार करण्यासाठी पाठलाग करता करता विहिरीत कोसळला. मांजर आणि बिबट्या दोघेही विहिरीत कोसळले. विहिरीची खोली भरपूर असल्याने दोघेही आतच अडकून पडले.

First published:
top videos

    Tags: Leopard, Pune