मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ही दोस्ती...,मैत्रिणीचा मृतदेह पाहून दुसऱ्या मैत्रिणीनेही मारली 5 व्या मजल्यावरून उडी

ही दोस्ती...,मैत्रिणीचा मृतदेह पाहून दुसऱ्या मैत्रिणीनेही मारली 5 व्या मजल्यावरून उडी

आकांक्षा आणि सानिका या दोघीही बालमैत्रिणी होत्या. अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ

आकांक्षा आणि सानिका या दोघीही बालमैत्रिणी होत्या. अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ

आकांक्षा आणि सानिका या दोघीही बालमैत्रिणी होत्या. अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 14 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील शेवाळवाडी मध्ये दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, एकीने गळफास घेतला आणि तिला रुग्णालयामधून घेऊन जातानाच त्याच ठिकाणी दुसरीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सानिका हरिश्चंद्र भागवत (वय- 19 ) आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय- 19) अशी आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावं आहे. शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ क्रिस्टल सोसायटी या इमारतीत सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

(प्रियकरासोबत भांडण, लग्नासही मिळाला नकार; लोणावळ्यातील तरुणीने उचललं भयानक पाऊल)

आकांक्षा व सानिका या दोघीही मैत्रिणी होत्या. सात वाजण्याच्या सुमारास सारिका हिने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सानिकाने गळफास घेतल्याचे कळताच कुटुंबीयांनी तातडीने याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच भागात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दार तोडून सारिकाचा मृतदेह खाली उतरवला. तिचा मृतदेह पोलीस रूग्णवाहिकेमध्ये घेऊन जात होते. सारिकाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सारिकाचा मृतदेह रुग्णावाहिकेमधून घेऊन जात असताना तिची मैत्रीण आकांक्षाने पहिले. आपल्या मैत्रिणीने आत्महत्या केल्याची तिला जबर धक्का बसला. त्यानंतर आकांक्षाने त्याच इमारतीचा पाचवा मजला गाठला. पाचव्या मजल्यावरन उडी घेतली आणि ती रुग्णवाहिकेजवळ पडली.

(थांब ना नको जाऊस, पती नसताना विवाहित प्रेयसीने केला आग्रह अन् घडलं भयानक कांड)

पाचव्या मजल्यावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याने आकांक्षाचाही मृत्यू झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. दोन्ही मुलींच्या पालकांचा आक्रोश काळीज पिळवाटून टाकणार होता. सानिकाने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

First published: