पुणे, 5 जानेवारी : राज्यभरात कोरोनाची तिसरी लाट (Maharashtra Corona Third Wave) येत असल्याचं चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली होती. त्यामुळे नागरिकही निश्चिंत झाले होते आणि नागरिकांनी नव वर्ष धुमधडाक्यात साजरं केलं. परिणामी गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. पुण्यात (Pune Corona Update) आज (5 जानेवारी) 1800 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 9 दिवसांपूर्वी दरदिवसाला 80 ते 100 रुग्ण सापडत होते. मात्र आज हा आकडा थेट 1800 पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुण्यातही कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर पुणे शहरातील नागरिकांना विनम्र आवाहन केलं आहे.
पुण्यात कोरोनाचा कहर वाढतोय.. pic.twitter.com/bpdhKPQ2ct
— News18Lokmat (@News18lokmat) January 5, 2022
मुंबईत (Mumbai) कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Patients) झपाट्यानं वाढ (rise) होत असून बुधवारच्या (Wednesday) एका दिवसात कोरोनाचे 15 हजार रुग्ण (15 thousand patients) सापडू शकतात, असा इशारा (Warning) देण्यात आला आहे.
हे ही वाचा-भयंकर! Omicron मुळे मुलाची अशी अवस्था; टेस्ट केल्याच्या 7 दिवसात दृष्टीच गेली!
महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्सचे (Maharashtra Task Force) सदस्य डॉ. शशांक जोशी (Dr. Shashank Joshi) यांनी ट्विट करत ही शक्यता वर्तवली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांत ज्या झपाट्यानं कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, ते पाहता दैनंदिन रुग्णसंख्या ही 15 हजारांच्या घरात जाऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. सध्या सलग दोन दिवसांपासून 10 हजारांच्या वर नव्या रुग्णांची नोंद मुंबईत केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Corona updates, Pune