मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'...तर आजही वेळ आली नसती', श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

'...तर आजही वेळ आली नसती', श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

आम्ही काय कोणाची स्पर्धा करायला जात नाही. आमचा दौरा हा वेगळा आहे त्या दौऱ्यामधून कळेलच.

आम्ही काय कोणाची स्पर्धा करायला जात नाही. आमचा दौरा हा वेगळा आहे त्या दौऱ्यामधून कळेलच.

आम्ही काय कोणाची स्पर्धा करायला जात नाही. आमचा दौरा हा वेगळा आहे त्या दौऱ्यामधून कळेलच.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 07 नोव्हेंबर : 'त्यांन अडीच वर्षे लागली शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचायला. अडीच वर्ष फिरले असते तर आज ही वेळ आली नसती' असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.

जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत पुण्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर-पाबळ पाणी पुरवठा योजनेच्या कोनशिला अनावरण सोहळयासाठी खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. .मात्र विध्यमान खासदार अमोल कोल्हे मात्र अनुपस्थित होते. यावेळी बोलत असताना श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

(नवनीत राणांवर कारवाई का नाही? तुम्ही मॅनेज झाले का? कोर्टाने पोलिसांना झापलं)

सिल्लोडला आदित्य ठाकरे दौरा घेत आहे. आता प्रत्येकाला दौरा घेण्याचा अधिकार आहे. आम्ही काय कोणाची स्पर्धा करायला जात नाही. आमचा दौरा हा वेगळा आहे त्या दौऱ्यामधून कळेलच. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोरडी आश्वासन देण्यापेक्षा सरकारने कृती मधून दाखवून दिले आहे की, शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्याचं काम या सरकारने केले आहे. पण त्यांना अडीच वर्षे लागली शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचायला, अडीच वर्षांपूर्वी जर या गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आली नसती, असा टोला शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

(अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंबाबत वापरले अपशब्द)

'आमचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्या भागात दौऱ्याची व्यवस्था केली आहे. सभा त्याठिकाणी आहे आणि शेतकऱ्यांना आम्ही भेटणार आहोत. गेल्या तीन महिन्यात शेतकऱ्यांसाठी कसे काम करत आहे व त्यांच्यासाठी निर्णय घेतले आहेत, त्यासाठी ते निर्णय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले का नाही हे पहिले जाईल, असं शिंदे म्हणाले.

First published:

Tags: Marathi news