पुणे, 29 जून : नोकरीवरून (job) काढून टाकल्याने दोघांनी दुकानाला आग (fire on shop) लावल्याची घटना उरुळी कांचन (uruli kanchan) परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार गायकवाड आणि अनिकेत मोटे अशी अटक (two arrested) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही उरुळी कांचन, सोलापूर रोड येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी स्वप्नील भगवान कांचन (वय 36, रा. उरुळी कांचन) यांनी पुणे शहर (pune city) पोलिसांतर्गत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात (loni kalbhor police staion) फिर्याद दिली आहे.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना जागा मिळणार का?
आरोपी गायकवाड आणि मोटे हे कांचन यांच्या दुकानात कामाला होते. दोघांनाही काही दिवसांपूर्वी नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. दोघांनी दुकानाला आग लावल्याचा संशय कांचन यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. आगीत दुकानातील 50 लाख रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.
तीन महिन्यातील दुसरी घटना
दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून अशीच घटना घडली होती. कामावरून काढून टाकल्याच्या रागातून तरुणाने लेडीज टेलरिंगचे दुकान चालविणाऱ्या महिलेवर पेट्रोल ओतून लायटरने जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली. महिलेला दुकानात जाळण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपी तरुणही आगीत होरपळून गंभीर जखमी झाला. महिलेचा आरडाओरडा ऐकून मदतीला धावून आलेला आरोपीचा मित्रदेखील जखमी झाला. ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचा रात्री मृत्यू झाला. तर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर अखेर एकनाथ शिंदे आले पुढे, आता मुंबईत होणार दाखल
आगीत लेडीज टेलरिंगचे दुकान चालविणाऱ्या बाला नोया जोर्निंग (वय 32, रा. वडगाव शेरी, मूळ रा. ओडिशा) या महिलेचे आणि पेट्रोल टाकून जाळणारा आरोपी मिलिंद नाथसागर (वय 35, रा. वडगाव शेरी) या दोघांचा मृत्यू झाला आहे. प्रशांतकुमार देबनार हा मदतीसाठी आलेला तरुण आगीत भाजला. चंदननगर पोलिसांनी महिलेचा जाळून खून केल्याप्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.