Home /News /maharashtra /

नवजात बाळाला शौचालयाच्या भांड्यात ठेवले होते कोंबून, पुणे हादरलं

नवजात बाळाला शौचालयाच्या भांड्यात ठेवले होते कोंबून, पुणे हादरलं

हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे मुश्किल झाले. त्यातच रक्तश्राव होत होता.

हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे मुश्किल झाले. त्यातच रक्तश्राव होत होता.

हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे मुश्किल झाले. त्यातच रक्तश्राव होत होता.

पुणे, 25 मे : पुण्यात (pune) मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या एका नवजात (newborn  baby) अर्भकाला आईनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने सार्वजनिक शौचालयातील संडासच्या (Public toilet) भांड्यात कोंबून ठेवल्याची मन हेलावून टाकणारी घटना पुण्यातील सिंहगडरोड परिसरात घडली आहे. पण, बाळाचे नशीब बलवत्तर असल्यामुळे या बाळाला पोलिसांच्या मदतीने वाचवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगडरोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगर इथं ही घटना घडली आहे. सार्वजनिक महिला शौचालय समाज मंदिरामागे तुकाई नगर वडगाव इथं एका महिलेने नवजात अर्भकास जन्म देऊन संडासचे भांड्यामध्ये कोंबून ठेवले होते. याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली आणि त्यांनी तातडीने पोलिसांना कळवली. माहिती मिळताच ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार माळी व कट्टे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी करताच त्यांना येथील महिला शौचालयात असलेल्या संडासच्या भांड्यात हे नवजात अर्भक कोंबलेले रडत असलेले आढळून आले. (उन्हाळ्यात दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी या 5 गोष्टी आहेत महत्त्वाच्या) त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नागरिकांच्या मदतीने हे चिमुकले बाळ संडासच्या भांड्यातून वरती काढण्याचा प्रयत्न केला. परंतु हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे मुश्किल झाले. त्यातच रक्तश्राव होत होता. त्यामुळे त्यांनी हाताला तेल लावून त्या चिमुकल्या बाळाला कसे बसे संडासच्या भांड्यातून मोठ्या मुश्किलीने बाहेर काढले. त्यानंतर तातडीने त्याला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केले आणि माळी व कट्टे यांचे अभिनंदन केले. (कबुतराची शिकार करण्यासाठी धावलं मांजर...पण...पुढे जे घडलं ते बघून वाटेल आश्चर्य;) दरम्यान, या निर्दयी प्रकारामुळे तुकाई नगर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निर्दयी आणि नराधम असलेल्या महिलेस व तिला साथ देणाऱ्या तिच्या प्रियकरास ताबडतोड अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. हे नवजात अर्भक मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस अमलदार अजय माळी यांनी सदर महिलेविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या