मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कंटेनरला ओव्हरटेक केलं अन् समोरून आली कार, भयानक अपघाताचा LIVE VIDEO

कंटेनरला ओव्हरटेक केलं अन् समोरून आली कार, भयानक अपघाताचा LIVE VIDEO

अचानक कार समोर आल्यानंतर शिळवणे यांनी कार आणि कंटेरनरच्या मधून जाण्याचा प्रयत्न केला. पण,

अचानक कार समोर आल्यानंतर शिळवणे यांनी कार आणि कंटेरनरच्या मधून जाण्याचा प्रयत्न केला. पण,

अचानक कार समोर आल्यानंतर शिळवणे यांनी कार आणि कंटेरनरच्या मधून जाण्याचा प्रयत्न केला. पण,

  • Published by:  sachin Salve

गणेश दुडुम, प्रतिनिधी

मावळ, 22 ऑगस्ट : लेनची शिस्त पाळा.. अशी सुचना नेहमी महामार्गावर दिली जात असते. पण, काही महाभाग हे घाईच्या नादात वाटेल तशा पद्धतीने गाडी चालवून आपली जीव धोक्यात घालतात. मावळमध्ये  (mava) असाच एक भयानक अपघात कारच्या समोरील कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वार कारला धडकला.

पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ही घटना घडली आहे. तळेगाव चाकण या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला असून कार च्या फ्रंट कॅमेऱ्यात अपघाताची दृश्ये कैद झाली. एका कंटेनरला ओव्हर टेक करण्याच्या नादात मोटरसायकलस्वार एका कारला धडकला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

बाळू गेणू शिळवणे हे आपल्या स्पेंलडर दुचाकीवरून भरधाव वेगाने तळेगाव चाकण या राष्ट्रीय महामार्गावरून चालले होते. समोर एक कंटेनर होता, त्याला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या इराद्याने शिळवणे यांनी सुसाटपणे ओव्हरटेक केला. पण, त्याच वेळी समोरून एक भरधाव कार आली. अचानक कार समोर आल्यानंतर शिळवणे यांनी कार आणि कंटेरनरच्या मधून जाण्याचा प्रयत्न केला. पण, अंतर कमी पडले आणि दुचाकी कारला धडकली.

(VIDEO| पैसे घ्यायला घरी ये सांगितलं अन् दोरीनं हात-पाय बांधले, 2 मजुरांना बेदम मारहाण सोलापुरातील घटनेनं महाराष्ट्र हादरला)

या अपघातात बाळू शिळवणे हे गंभीर जखमी झाले आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. दुचाकी चालकावर आंबी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सीसीटीव्हीची दृष्य बघता केवळ दैव बलवंत्तर असल्यानेच तो वाचला असल्याचं पाहायला मिळतंय.

First published: