पुणे, 02 ऑगस्ट : शिंदे सरकारला एक महिना पूर्ण होत आहे पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. पण, आमचे सरकार चांगले चालले आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले, पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान जिवितहानी याचा आढावा घेतला. या बैठकीला अजित पवार वगळता राष्ट्रवादीचे सगळे विधानसभेचे आमदार उपस्थित होते. तर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्हे अनुपस्थित होत्या. चर भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील अनुपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन शिंदेंनी विरोधकांना उत्तर दिले.
'आमचं सरकार चांगलं चाललंय आहे, शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही योजना थांबली होती. ती परत सुरू केली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केले आहे. दुष्काळी भागामध्ये पाणी वळवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक छोटे मोठे निर्णय घेतले. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल' अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
(BREAKING : संजय राऊतांच्या चौकशीतून नवी माहिती समोर, ED ची मुंबईत 2 ठिकाणी धाड)
'ईडीच्या कारवाईमध्ये संजय राऊत यांच्या घरात पैसे सापडले आहे. आता त्यांच्या घरात सापडलेल्या पैशांवर माझे नाव कसे आले हे मला माहिती नाही. मुळात ज्यांच्या घरात सापडले ते लिहू शकता ना, माझं नाव कसं काय लिहिलं, त्याबद्दल संजय राऊत सांगू शकतात त्यांना तुम्ही विचारा, असंही शिंदे म्हणाले.
'मी हेलिकॉप्टर थांबवल्याची एक बातमी व्हायरल झाली आहे. पण त्यांचं झालं काय, पाटण्यामध्ये एक प्रकार घडला होता. तिथे आपले मराठी कुटुंबीय होते. त्यांच्या घरी सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईत परत आणायचे होते. दादा भुसे यांच्या संपर्कातील नेत्याचे एक मुंबईतील हॉस्पिटलमध्ये काम होते. त्यामुळे मला फोन करायचा होता. त्यासाठी मी पुढे जाण्याआधी हेलिकॉप्टर चालकाला थांबण्याचे आदेश दिले होते, असा खुलासाच शिंदेंनी केला.
(कुशलला पडला मित्रांचा चोप; विनोदवीराने असं केलं तरी काय?)
'बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने फुटबॅाल मैदानाच उदघाटन करणार होते. पण एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या ऐवजी आनंद दिघे यांच्या नावाने उदघाटन करणार आहे.
मी त्या कार्यकर्त्याला आधीच सांगितलं होतं, माझं नाव असलं की अशा कार्यक्रमाला मी जात नसतो. आता त्याने प्रेमापोटी केलं असेल. आता त्याने आनंद दिघे नाव दिले आहे, असंही शिंदेंनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.