मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ठाकरे सरकारला 2 वर्ष पूर्ण, राज्यपाल म्हणाले, मग 'बाजार में जाओ और मिठाई खाओ'

ठाकरे सरकारला 2 वर्ष पूर्ण, राज्यपाल म्हणाले, मग 'बाजार में जाओ और मिठाई खाओ'

राज्यपालांनी दिलेली ही प्रतिक्रिया ठाकरे सरकारच्या कामावर समाधान व्यक्त करणारी आहे की ठाकरे सरकारला उपरोधिक टोला...

राज्यपालांनी दिलेली ही प्रतिक्रिया ठाकरे सरकारच्या कामावर समाधान व्यक्त करणारी आहे की ठाकरे सरकारला उपरोधिक टोला...

राज्यपालांनी दिलेली ही प्रतिक्रिया ठाकरे सरकारच्या कामावर समाधान व्यक्त करणारी आहे की ठाकरे सरकारला उपरोधिक टोला...

पुणे, 30 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष (mva government 2 years) पूर्ण झाले आहे. एकीकडे भाजपचे नेते सरकार पडण्याची भविष्यवाणी करत आहेत तर दुसरीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor bhagat singh koshyari) यांनीही आपल्या शैलीत सरकारवर निशाणा साधला आहे,  "बाजार में जाओ और मिठाई खाओ" अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोशारी हे पुणे दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी आळंदीत त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतलं. आज पुण्यातील mit विश्व विद्यालयात आयोजित संत ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोपाप्रसंगी  ते उपस्थित राहिले त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

नुकतंच राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहे.  यावर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पत्रकारांनी विचारले असता राज्यपालांनी, 'बाजार में जाओ और मिठाई खाओ' अशी शब्दात प्रतिक्रिया दिली.

सोंडेत धरली गाडी आणि...; चवताळलेल्या हत्तीचा पर्यटकांवर खतरनाक हल्ला; पाहा VIDEO

'भक्ती, ज्ञान आणि कर्माने स्वतः चारित्र्यवान होत चारित्र्यसंपन्न समाज आणि विश्वबंधुत्वाची भावना प्रस्थापीत करण्याचे कार्य करावे. साधू-संत, क्रांतिकारी यांचा त्याग आणि बलिदान आपल्याला देशभक्तीसाठी प्रेरित करणारे आहे. आपल्या ऋषीमुनींचे ज्ञान, वसुधैव कुटुंबकम आणि एकं सतचे तत्व जगाला मार्गदर्शक आहे. बौद्धिक, अध्यात्मिक आणि शारीरिक शक्तीच्या समन्वयाने जगात संतुलन स्थापित होईल, अन्यथा बलशाली राष्ट्रे इतरांवर वर्चस्व प्रस्थापित करतील' असंही राज्यपाल म्हणाले.

विशेष म्हणजे, राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. विधान परिषद नियुक्त आमदाराचा मुद्दा असो अथवा विशेष अधिवेशनाची मागणी असो, या ना त्या मुद्यावरून राज्यपाल आणि सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे.  अनेकदा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडीतील कलगीतुरा रंगताना आपण बघितला आहे, या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी दिलेली ही प्रतिक्रिया ठाकरे सरकारच्या कामावर समाधान व्यक्त करणारी आहे की ठाकरे सरकारला उपरोधिक टोला आहे, याबद्दल राज्यपालाच सांगू शकतील.

टोमॅटोचे भाव 1 वर्षात तब्बल 50 टक्क्यांनी वाढले; दोन महिन्यात 25 टक्क्यांनी वाढ

पण, काही महिन्यांपूर्वी राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र आणि त्या पत्राला आलेले मुख्यमंत्र्यांचे उत्तर हा सर्व प्रकार लक्षात घेता राज्यपालांनी आज दोन वेळा 'बाजार में जाओ मिठाई खाओ' अशी दिलेली आजची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

First published: