मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

TET exam scam: टीईटी परीक्षा घोटाळ्याचं दिल्ली कनेक्शन उघड; दिल्लीतून दोघांना अटक तर तुकाराम सुपेच्या ड्रायव्हरलाही अटक

TET exam scam: टीईटी परीक्षा घोटाळ्याचं दिल्ली कनेक्शन उघड; दिल्लीतून दोघांना अटक तर तुकाराम सुपेच्या ड्रायव्हरलाही अटक

टीईटी परीक्षा घोटाळ्यात दिल्लीतून आशुतोष शर्माला अटक

टीईटी परीक्षा घोटाळ्यात दिल्लीतून आशुतोष शर्माला अटक

TET exam scam connection to delhi: टीईटी परीक्षा घोटाळ्याचं दिल्ली कनेक्शन आता उघड झालं आहे. यासोबतच तुकाराम सुपे याच्या ड्रायव्हलाही पोलिसांनी अटक कलेी आहे.

पुणे, 31 डिसेंबर : टीईटी परीक्षा घोटाळा (TET Exam Scam case) प्रकरणात आता नवी माहिती समोर आली असून या घोटाळ्याचं दिल्ली कनेक्शनही (TET exam scam Delhi connection) समोर आलं आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यात आणखीन दोन जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीतून पोलिसांनी आशुतोष शर्मा याला अटक (Ashutosh Sharma arrest from Delhi) केली आहे. अटकेत असलेल्या निशीद गायकवाड याच्या चौकशीतून आशुतोष शर्मा आणि सहकार्याने पेपर पुरविल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच तुकाराम सुपेच्या ड्रायव्हरलाही अटक करण्यात आली आहे. टीईटी घोटाळ्यात आतापर्यंत पोलिसांनी एकूण 31 आरोपींना अटक केली आहे. (Tukaram Supe driver arrest in TET exam scam case)

तुकाराम सुपेच्या ड्रायव्हरला अटक

टीईटी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे याला अटक करण्यात आली आहे. तुकाराम सुपे याच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याचा ड्र्रायव्हर सुनील खंडू घोलप यालाही अटक कलेी आहे. सुनील घोलप याचा गुन्हात सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते त्यानंतर 29 डिसेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली.

एजंटही अटकेत

या परीक्षा घोटाळा प्रकरणात एजंट मनोज डोंगरे यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मनोज डोंगरे याला लातूर येथून चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशी नंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा : TET exam scam : अश्विन कुमारच्या घरी सापडलेल्या दागिन्याची किंमत तब्बल...

दिल्ली कनेक्शन

पुणे पोलिसांच्या सायबर टीमने दिल्ली येथून आशुतोष शर्मा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यासोबत आणखी एका आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दोघांचीही चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना 30 डिसेंबर रोजी अटक केली.

तुकाराम सुपेंच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

आरोग्य भरतीनंतर, म्हाडा आणि आता टीईटी पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापून निघालं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली. पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले आहेत. सुपे यांच्या घरी छापा टाकायच्या आधी पत्नी आणि मेहुण्याने ही रक्कम दुसऱ्या ठिकाणी लपवली होती.

अश्विन कुमारच्या घरातून 25 किलो चांदी अन् 2 किलो सोने जप्त

पुणे पोलिसांच्या एका पथकाने आरोपी अश्विन कुमार याच्या बंगळुरू येथील घरातून तब्बल 24 किलो चांदी दोन किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहे. टीईटी भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार (Ashwin Kumar) याला अटक केली होती.

First published:

Tags: Exam, Pune, Scam