मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'पाळण्यातल्या बाळांपासून ते पंजोबापर्यंत माफी मागतो', तानाजी सावंत आले भानावर

'पाळण्यातल्या बाळांपासून ते पंजोबापर्यंत माफी मागतो', तानाजी सावंत आले भानावर

'जर मराठा आरक्षण माझ्या कारकिर्दी मिळाले नाहीतर मंत्रिपदाचा राजीनामा देईन.

'जर मराठा आरक्षण माझ्या कारकिर्दी मिळाले नाहीतर मंत्रिपदाचा राजीनामा देईन.

'जर मराठा आरक्षण माझ्या कारकिर्दी मिळाले नाहीतर मंत्रिपदाचा राजीनामा देईन.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 26 सप्टेंबर : 'मराठा आरक्षण मागण्याची खाज सुटली का, असं वादग्रस्त विधान करणारे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत अखेर भानावर आले आहे. 'अर्थ माझ्या विधानामुळे मराठा बांधवाच्या भावना दुखाव्यात किंवा राजकीय ताशेरे ओढावे, या पठडीतला मी नाही. माझ्या विधानामुळे माझ्या समाजाच्या बांधवाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील पाळणातल्या बाळापासून ते आजोबा, पंजोबांची जाहीर माफी मागतो' असं म्हणत सावंत यांनी सारवासारव केली आहे.

या ना त्या मुद्यामुळे कायम चर्चे राहणारे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत धक्कादायक विधान केलं आहे. त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर सावंत यांनी अखेरीस माफी मागितली आहे.

'आमच्या ग्रामीण भागातील भाषेत चर्चा करत असताना बोलण्याच्या भरात बोलून गेलो. पण त्याचा अर्थ माझ्या विधानामुळे मराठा बांधवाच्या भावना दुखाव्यात किंवा राजकीय ताशेरे ओढावे, या पठडीतला मी नाही. माझ्या विधानामुळे माझ्या समाजाच्या बांधवाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील पाळणातल्या बाळापासून ते आजोबा, पंजोबांची जाहीर माफी मागतो'असं सावंत म्हणाले.

तसंच, 'मी या समाजातला कार्यकर्ता आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, समाजातील मुला मुलींना करिअर करण्याची गरज आहे. आमचा समाज मागासलेला आहे. ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे. माझं एक तासाचं भाषण होतं, पण त्या भाषणातून फक्त मोजकंच दाखवण्यात आले आहे. मराठा समाजातला व्यक्ती आज मंत्रिपदावर आहे. त्यामुळे मराठा आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही, या भाषेत मी बोललो आहे' असंही सावंत म्हणाले.

'जर मराठा आरक्षण माझ्या कारकिर्दी मिळाले नाहीतर मंत्रिपदाचा राजीनामा देईन. मी पहिल्यापासून मराठा समाजासोबत आहे. पण माध्यमांनी माझी ही भूमिका दाखवली नाही. माझ्या बोलण्यामुळे मराठा बांधवांची भावना दुखावली गेली असेल तर जाहीरपणे माफी मागतो, नुसती माफी मागून स्वस्त बसणार नाही. माझ्या मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्न करत राहणार आहे' अशी ग्वाहीही सावंत यांनी दिली.

काय म्हणाले होते सावंत?

'ज्या समाजात मी जन्मलो त्या समाजासाठी मी आहेच, मग बाकीच्या जातींचा द्वेष करा असं थोडी आहे. यांचे डोक बघा कसं चालतंय. कधी ओबीसीतून आरक्षण द्या, आम्हाली एससी समाजातून आरक्षण मागितले जात आहे. नेमकं यामागे डोक कुणाचं आहे, हे लोकांना लक्षात आले पाहिजे. दोन महिन्यांपूर्वीच सत्तांतर झाले आणि लगेच आरक्षणाची खाज सुटली, असं वक्तव्य सावंत यांनी भर सभेत केलं.

आता बघा यांचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला. मराठा मोर्चासाठी राज्यभरात मुक मोर्चा काढण्यात आले. त्यांचा अपमान केला, आम्ही गप्प बसलो. ब्राम्हण म्हणून टीका करण्यात आली. पण, याच ब्राम्हणाने 2017-18 ला याच मराठा समाजाची झोळी भरली. मराठ्यांना आरक्षण दिलं. दोन तीन बॅच बाहेर आल्या, ज्यावेळेस 2019 ला लोकांचा विश्वासघात करून ही लोक सत्तेवर आली आणि 6 महिन्यात मराठा आरक्षण गेलं, अशी टीका सावंत यांनी केली होती.

First published: