मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

साडीच्या वादावर सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण, चित्रा वाघ यांनाही फटकारलं

साडीच्या वादावर सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण, चित्रा वाघ यांनाही फटकारलं

' जर 35 मिनिटांचं भाषण हे 17 सेकंदाचं सांगत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहे'

' जर 35 मिनिटांचं भाषण हे 17 सेकंदाचं सांगत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहे'

' जर 35 मिनिटांचं भाषण हे 17 सेकंदाचं सांगत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहे'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 21 नोव्हेंबर : 'काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारासोबत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही महिला पत्रकारांना साडी का नेसत नाही? असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. अखेर सुप्रिया सुळे यांनी यावर स्पष्टीकरण देत भाजपला टोला लगावला.

'चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलताना? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टर्नायझेशन करतोय' असं मत सुप्रिया सुळे यांनी मांडल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत टीका केली होती. त्यावर सुप्रिया सुळेंनी जशास तसे उत्तर दिले.

" isDesktop="true" id="789162" >

'माझं भाषण नीट ऐका, एकूण 35 मिनिटांचं भाषण होतं. माझी विनंती आहे की, पूर्ण ऐकावं. थोडा वेळ पाहून ऐका त्यात मी काय म्हटलं. मी सविधानावर विश्वास ठेवणारी आहे. माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, ते आमचे विरोधक करत आहे. ते आमचं काही कौतुक करणार नाही. त्यांनी फार टीका केली त्या त्याबद्दल काही वाटत नाही. माझी आई नेहमी सांगते निंदकाचे घर हे शेजारी असावे, ते विरोधक काम पूर्ण करत आहे. आज टेक्नॉलाजी वाढली आहे. पण त्याचा गैर वापर होत आहे. जर 35 मिनिटांचं भाषण हे 17 सेकंदाचं सांगत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला.

(शिवाजी महाराजांबद्दलचं ते वक्तव्य भाजपची अधिकृत भूमिका? चंद्रशेखर बावनकुळेंचं गोलमाल उत्तर)

'मी कुणाला काहीही बोलले नाही. मी एक मत मांडलं आहे. प्रत्येकाचा तो वैयक्तिक अधिकार आहे, असंही मी त्या भाषणात सुद्धा सांगितलं होतं, असंही सुळेंनी सांगितलं.

'फडणवीसांकडून अपेक्षा नव्हती'

माझी भूमिका ही पक्षाची भूमिका राज्यपाल याच्यावर टीका करण आपली संस्कृती नाही. पण ते बोलतात  छत्रपती अपमान करण्याच पाप हे सर्व करतात.राज्यपाल यांनी सुद्धा हेच केलं आहे. हे कुठे तरी थांबलं पाहिजे. राज्यपाल हे परत परत चूक करत आहेत, याचा अर्थ ते जाणूनबुजून करत आहे. ही चूक नसून चॉईस झाली आहे, अशी टीका सुळे यांनी केली.

'फडणवीस आपसे ये उमीद ना थी. दिल्लीवरून फडणवीस यांना फोन आला आणि त्यांनी राज्यपाल यांची पाठराखण केली. यापुढे भाजप छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असा पलटवारही सुळे यांनी फडणवीसांवर केला.

'इतिहास हा खरा मांडला पाहिजे सिनेमा वेगळा अन् खरं वेगळं असतं. इतिहास आणि काल्पनिक वेगळं,ट्विट बाबत याचा इतिहास असेल म्हणून त्यानी असं ट्विट केलं

मला त्यांचं ट्विट नीट पाहयला हवं ते पाहुन मी बोलेल. पण सावरकर यांच्या दोन बाजू आहेत. सावरकरांबद्दल दोन टोकाच्या भूमिका आहेत, असंही सुळे म्हणाल्या.

(इतिहासामुळे वादात सापडलेल्या भगतसिंग कोश्यारींचा इतिहास, अशी झाली राजकारणात एण्ट्री!)

'नवले पुलावर सर्व्हिस रोड झाला नाही. क्रोनिक पॉईंट झाले, उतार आहे या रस्त्यावर काम करणे महत्वाचे आहे. आज पुणे महापालिका आयुक्त यांची भेट घेणार आहे. सगळी माहिती ही गडकरींना देणार आहोत, तात्काळ यावर उपाय योजना केली पाहिजे. आता अपघात कमी झाले आहेत ते आता शून्यावर आणायचे आहेत. स्पीड मोठा प्रॉब्लेम आहे अपघातात. सर्विस रोड, चांगले फुटपाथ करणं गरजेचं आहे. पुणे पालिकेनं हे केलं पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी केली.

First published: