मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपचं 'मिशन बारामती', सितारामन यांच्या दौऱ्यानंतर सुप्रिया सुळेंच्या पायालाही भिंगरी

भाजपचं 'मिशन बारामती', सितारामन यांच्या दौऱ्यानंतर सुप्रिया सुळेंच्या पायालाही भिंगरी

भाजपच्या केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन बारामती लोकसभा मतदारसंघच्या दौऱ्यावर येऊन जाताच खासदार सुप्रिया सुळेही पायाला भिंगरी लावल्यागत मतदारसंघात फिरू लागल्यात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Baramati, India

बारामती, 26 सप्टेंबर : भाजपच्या केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन बारामती लोकसभा मतदारसंघच्या दौऱ्यावर येऊन जाताच खासदार सुप्रिया सुळेही पायाला भिंगरी लावल्यागत मतदारसंघात फिरू लागल्यात. पुण्यातल्या सोसायट्या म्हणू नका गावोगावची देवी मंदिरं म्हणू नका, सगळीकडे सुप्रियाताई धावत्या भेटी देऊ लागल्यात.

बारामतीच्या संसदपटू पुरस्कार विजेत्या खासदार सुप्रिया सुळे आपल्या मतदारांसाठी धावपळ करत आहेत, पण हल्ली त्यांच्या बारामती मतदार संघ दौऱ्याची वारंवारिता जरा जास्तच वाढली आहे. गेल्या दोन दिवसाचेच शेड्युल बघाना... रविवारी ताईंनी उंड्री परिसरातील सोसाट्यांमधून तब्बल 13 ठिकाणी धावत्या भेटी दिल्या. बरं हे तर काहीच नाही, सोमवारी तर ताईंनी पहिल्यांदाच एकाच दिवशी तब्बल 13 गावांना भेटी दिल्या. बरं आता नवरात्र म्हटल्यावर त्यात्या गावच्या ग्रामदेवींचं दर्शनही ओघाने आलंच.

आता ताईंच्या मॅरेथॉन दौऱ्यावर विरोधक अशीही टीका करू लागलेत की सितारामन बारामतीत येऊन गेल्यानेच सुप्रियाताई पुन्हा मतदारसंघातील दौरे वाढवू लागल्यात, पण या आरोपांचंही ताईंनी अतिशय विनम्रपणे खंडन केलंय. टीका करणं हे तर विरोधकांचं कामच आहे, मी माझ्या मतदारांसाठी फिरतेय त्यांची कामं करतेय, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली.

खरंतर निर्मला सितारामन यांनीही बारामती दौऱ्यावर असताना जेजुरी आणि मोरगावच्या बाप्पाचं दर्शन घेतलं तर सुप्रियाताईंनी नवरात्राचा मुहुर्त साधलाय, पण यानिमित्ताने का होईना पवारांची बारामती पुन्हा लाईमलाईटमध्ये आलीय हेही तितकंच खरं.

First published:

Tags: Baramati, BJP, NCP, Supriya sule