Home /News /maharashtra /

HSC Result : बारावीचा निकाल पाहिला आणि विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल, पुण्यातील धक्कादायक घटना

HSC Result : बारावीचा निकाल पाहिला आणि विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल, पुण्यातील धक्कादायक घटना

निखिल हा गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. बारावीचा निकाल लागणार असल्याने तो आपल्या इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच उत्सुक होता.

    पुणे, 8 जून : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education MSBSHSE) मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC class 12 result) आज जाहीर झाला. याच निकालानंतर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नापास झाल्याचे उचचले चुकीचे पाऊल -  बारावीच्या निकाल्याचे निमित्ताने राज्यातील सर्वच विद्यार्थी उत्सुक होते. मात्र, पुण्यातील एका विद्यार्थी नापास (Student Failed in HSC) झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या (Student Suicide) केली. निखिल लक्ष्मण नाईक (वय 19, रा. श्रावणधारा वसाहत), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. मृत निखिल हा गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. बारावीचा निकाल लागणार असल्याने तो आपल्या इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच उत्सुक होता. दुपारी एक वाजता हा निकाल लागणार होता. निकाल लागल्यावर निखिलने आपला निकाल तपासला. तर तो नापास झाल्याचे त्याला समजले. यानंतर तो अत्यंत निराश झाला आणि त्याने इमारतीवर जाऊन उडी मारत आत्महत्या केली. याचवेळी त्याठिकाणी खाली उभ्या असलेल्या शेखर लहू लोणारे यांच्या अंगावरच तो पडला. त्यात लोणारेही गंभीर झाले. तर निखिल याचा जागीच मृत्यू झाला. हेही वाचा - Maharashtra HSC Result 2022: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 94.22 टक्के शांत स्वभावाचा होता निखिल - निखिल शांत स्वभावाचा होता. त्याला क्रिकेटचीही आवड होती. तसेच बॉडी बनविण्याच्या इराद्याने जीमही सुरू केली होती. त्याची वडील आचारी आहेत. तर आई घरकाम करते. त्याच्या जाण्याने त्याच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला आहे. तर परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. यानिमित्ताने हा मुद्दा ऐरणीवर - ज्या इमारतीमध्ये निखिलने आत्महत्या केली, त्याच इमारतीमधून सहा महिन्यांपूर्वी एका पाच वर्षाच्या बाळाचा पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे  इमारतीला सुरक्षा जाळी असती तर दोघांचे जीव वाचले असते. मोठ्या इमारतीमध्ये सुरक्षा जाळ्या लावल्या तर अशा प्रकारच्या दुर्घटना टळतील, असे मत येथील स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, Suicide news

    पुढील बातम्या