गणेश दुडाम, पुणे 28 नोव्हेंबर : साप समोर दिसला किंवा त्याचं नावही ऐकलं तरी अनेकांना घाम फुटतो. कारण हा लहान जीव अगदी काही मिनिटांमध्येच एखाद्याचा जीव घेऊ शकतो. मात्र, अनेकदा अचानक आपल्यासोबत अशा काही घटना घडतात, ज्या थरकाप उडवणाऱ्या असतात. अशीच एक घटना आता मावळातून समोर आली आहे. ज्यात विषारी नाग एका व्यक्तीच्या छातीवर पडला.
ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! 18 व्हिलरचा भलामोठा ट्रक पठ्ठ्याने असा पार्क की VIDEO तुफान व्हायरल
वातावरणाचा फटका वन्यजीवांनाही बसू लागला आहे. दोन दिवसांपासून मावळात उकाडा जाणवू लागलाय. त्यामुळे सरपटणारे वन्यजीव सैरभैर होत असल्याचं आंबी एमआयडीसीतील कामगार वस्तीत दिसून आलं. याठिकाणी एक थरकाप उडवणारी घटना घडली.
कामावरून घरी आलेला कामगार नुकताच जमिनीवर आडवा पडला होता. इतक्यात त्याच्या छातीवर विषारी नाग पडला. या नागाला पाहताच कामगार घाबरून गेला. वेळ न घालवता त्याने लगेच त्याच्या हाताजवळ असलेला मोबाईल घेतला आणि त्यावरुन त्याने सहकाऱ्याला याबाबत माहिती दिली. यानंतर वन्यजीव रक्षक मावळच्या सर्प मित्रांनी या नागाला पकडून सुरक्षित स्थळी सोडून दिलं.
सुदैवाने छातीवर पडूनही या नागाने कामगाराला चावा घेतला नाही. त्यामुळे या घटनेत मोठा अनर्थ टळला. मात्र, ही घटना थरकाप उडवणारी होती.
फॉर्च्यूनर कॅनॉलमध्ये कोसळली -
पंढरपूर -कुर्डुवाडी रोडवर फॉर्च्यूनर गाडीचा जबरदस्त अपघात झाल्याची बातमीही नुकतीच समोर आली आहे. या अपघातात ही गाडी पुलावरुन ५० फूट खाली कॅनॉलमध्ये कोसळली. कुर्डुवाडीवरुन पंढरपूरकडे येणारी गाडी आष्टी रोपळे येथे अंदाज न आल्याने कॅनॉलमध्ये कोसळली. या घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.