पुणे, 18 जून : काँग्रेस नेता आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर (Sidhu Moosewala Murder) पोलिसांनी याप्रकरणी संशयित शूटर्सला ताब्यात घेतलं. यात पुण्यातील संतोष जाधवलाही अटक करण्यात आली. त्याचवेळी संतोष जाधव याच्याकडे केलेल्या तपासात पोलिसांना 13 पिस्तूल मिळाली आहेत. या प्रकरणात आणखी चार जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगाव मधून अटक केली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधवला मूसेवाला हत्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र कनेक्शन ज्यांच्यामुळे समोर आलं होतं त्या संतोष जाधव आणि सौरभ महाकाल याला आपण ओळखत असल्याचा लॉरेन्स बिश्र्नोई याने मान्य केलं आहे. पण बिष्णोई टोळीत याचे महत्त्व अत्यंत किरकोळ असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
(Agnipath : राहुल गांधींनी पंतप्रधानांना लगावला 'माफीवीर'चा टोला, म्हणाले...)
सौरभ महाकाल आणि संतोष जाधव यांच्या अटकेनंतर केलेल्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांकडे अनेक मोठे खुलासे झाले आहेत. लॉरेन्स बिष्णोई याला पंजाब पोलिसांनी अटक केल्यानंतर पुणे पोलिसांचे एक पथक पंजाबला जाऊन लॉरेन्सकडे तपास करून आलंय. त्यांना दिलेल्या माहितीत लॉरेन्स हा संतोष आणि सौरभ महाकाल यांना ओळखत असल्याचं मान्य करतो. मात्र त्याच्या मुसेवाला हत्या प्रकरणात सहभाग आहे की नाही याबाबत कल्पना नसल्याचं त्याने पुणे पोलिसांना सांगितलंय.
संतोष जाधव यांच्याकडे तपास केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांना जुन्नर मधल्या एका वॉटर प्लांट व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मध्यप्रदेश मधून तब्बल 13 पिस्टल आणल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी नारायणगाव परिसरात मोठी कारवाई करत चार जणांना अटक केली आणि हे तेरा पिस्टल ताब्यात घेतले आहे. मात्र यात 13 पिस्टल सोबत एकही गोळी नसल्याने पोलिसांनाही हे पिस्तुल नेमके कशासाठी आणली याचा तपास करावा लागणार आहे. अटक केलेल्या चार आरोपींपैकी दोन आरोपी हे रेकॉर्ड वरचे गुन्हेगार आहेत.
संतोष जाधव हा इंस्टाग्राम आणि सोशल मीडियातून लॉरेन्स विष्णूच्या संपर्कात आला होता. त्याने नारायणगावमधून तो पंजाबमध्ये पळून गेला होता. तिथे लॉरेन्स बिश्र्नोई याने त्याची राहण्याची व्यवस्था केली होती. तेव्हापासून तो लॉरेन्स बिश्र्नोई टोळीच्या संपर्कात आला होता. सौरभ महाकाल ही लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या विक्रम बरार, सचिन बिश्नोई यांच्या संपर्कात होता. मात्र केवळ या टोळीचे नाव घेऊन गुन्हे करूनही या दोघांनाही काही किरकोळ हजार रुपये मिळाले होते. त्यांची राहणीमानाची अवस्थाही अत्यंत खराब आहे.. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून आभासी जगात फार मोठे गुन्हेगार असल्याचा आव आणून भविष्यात मोठे खंडणी वसूल करता येईल किंवा पैसे मिळवता येईल या हेतूने पोलीस तपासातही हे आरोपी मोठमोठ्या स्टार्सची नाव घेऊन आपण त्यांची हत्या करणार होतो किंवा खंडणी वसूल करणार होतो असं सांगत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय.
(राखी सावंत भररस्त्यात बाॅयफ्रेंडसोबत झाली रोमॅन्टिक, पाहा व्हिडीओ)
या सगळ्या आरोपींनी सांगितलेल्या गोष्टी तपासल्या वरच त्यावर विश्वास ठेवता येईल. आरोपी खोट्या प्रसिद्धीसाठी अतिरेकी खोटं बोलत असण्याची शक्यता जास्त आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर संतोष जाधव आणि सौरभ महाकाल यांचे चांगल्या घरातले अल्पवयीन मुलं फॉलोवर्स आहेत. इंस्टाग्राम वर टाकल्या जाणाऱ्या हातात बंदुका असणाऱ्या रिल्स खऱ्या वाटून अल्पवयीन मुलं त्याकडे आकर्षित होत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे अशा मुलांच्या पालकांना बोलावून त्यांचे समुपदेशन केले जाणार असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे.
संतोष जाधव आणि सौरभ महाकाल याची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत खालावलेली आहे. त्यांचं राहणीमान अत्यंत सुमार दर्जाचा आहे. ज्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचं नाव घेऊन हे दोघेही धाक दाखवण्याचा आणि गुन्हेगारी जगतात नाव कमावण्याचा प्रयत्न करत आहे, त्या टोळीमध्ये ही दुसऱ्या फळीतल्या गुन्हेगारांमध्ये खुनाची जबाबदारी घेणे किंवा मोठ्या मोठ्या स्टार्सची नाव घेऊन धमकी देणे आणि खंडणी मिळवण्यासाठी ची रक्कम वाढवून घेणे अशीच स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात असणाऱ्या छोट्या-मोठ्या गुन्हेगारांना स्वतःकडे आकर्षित करून ठेवण्यासाठी आपली ताकद वाढवण्यासाठी करण जोहरच्या खंडणी सारखे प्रकरण केले जात असल्याचंही पोलिसांच म्हणणं आहे.
ग्रामीण भागातली अल्पवयीन मुलं अतिसामान्य गुन्हेगारांना त्यांचा आयडल समजत आहेत, त्यांनी प्रत्यक्ष त्यांची आर्थिक परिस्थिती राहणीमान सगळं पहावं खरी स्थिती समजून घ्यावी आणि लगेच गुन्हेगारीचा आकर्षण सोडून द्यावं, असं आवाहन ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.