Home /News /maharashtra /

पावसाच्या सुरुवातीलाच पुण्यातून धक्कादायक वृत्त; सिंहगडावर दरड कोसळल्याने ट्रेकर्सचा जागीच मृत्यू

पावसाच्या सुरुवातीलाच पुण्यातून धक्कादायक वृत्त; सिंहगडावर दरड कोसळल्याने ट्रेकर्सचा जागीच मृत्यू

पुणेकरांसाठी सिंहगड हे भटकंतीसाठीच आवडत ठिकाण. पावसाळ्याच्या दिवसात तर शनिवार-रविवार येथे मोठी गर्दी असते.

पुणे, 26 जून : पावसाची चाहूल लागताच ट्रेकर्स डोंगराच्या दिशेने धाव घेतात. पुण्यातील (Pune News) सिंहगडमधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी सिंहगडावरील कल्याण दरवाज्याजवळ पायवाटेवर दरड कोसळण्याची घटना घडली होती. दुर्दैवाने या दुर्घटनेत हेमंग धीरज गाला या प्रशिक्षित ट्रेकर्सचा दगडांच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच तानाजी भोसले व पीआरटी पथकाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अंधारात शोधकार्य करुन मृतदेह शोधून बाहेर काढला. हेमंग गाला हा सिंहगड एपिक ट्रेक या स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यातच हेमंतचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शोक व्यक्त केला जात आहे. पुणेकरांसाठी सिंहगड हे भटकंतीसाठीच आवडत ठिकाण. पावसाळ्याच्या दिवसात तर शनिवार-रविवार येथे मोठी गर्दी असते.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या