Home /News /maharashtra /

'ही तर शिवसैनिकांची उत्सफूर्त प्रतिक्रिया', उदय सामंतांवरच्या हल्ल्यानंतर ठाकरे गटाची फर्स्ट रिएक्शन

'ही तर शिवसैनिकांची उत्सफूर्त प्रतिक्रिया', उदय सामंतांवरच्या हल्ल्यानंतर ठाकरे गटाची फर्स्ट रिएक्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे त्यांच्यासोबतच्या शिवसेना आमदारांसोबत आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या पुणे दौऱ्यात राजकीय राडा झाला आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 2 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे त्यांच्यासोबतच्या शिवसेना आमदारांसोबत आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या पुणे दौऱ्यात राजकीय राडा झाला आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. ठाकरे गटाचे नेते, शिवसेनेचे हिंगोलीचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी या प्रकरणावर तिकट प्रतिक्रिया दिली आहे. हा शिवसैनिकांचा रोष आहे, असं ते म्हणाले आहेत. "महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये रोष आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या समाचार घेण्यासाठी शिवसैवनिक सज्ज झाले आहेत. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे त्या सर्व लोकांना अशाच प्रकारच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. शिवसैनिकांचा हा हल्ला नाही तर त्यांची ही उत्सुर्त प्रतिक्रिया आहे. ज्यांनी गद्दारी केलीय त्यांच्याविरोधात असा रोष व्यक्त होणारच. आमच्या पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला अशा गद्दारांना धडा शिकवणताना कोणत्याही कारवाईला सामोरं जायला आम्ही तयार आहोत", अशी प्रतिक्रिया बबनराव थोरात यांनी दिली. "जे शिवसैनिक शिवसेनेसाठी अहोरात्र मेहनत घेतात त्यांनी गद्दारांना धडा शिकवला तर शिवसेना पक्षप्रमुख सन्मानच करतील. यापुढे गद्दारांची शिवसेनेसोबत गद्दारी करण्याची हिंमत होणार नाही. शिवसेनेसाठी कोणतीही जबाबदारी घेण्यास मी तयार असतो. प्रत्येक जिल्ह्यातून अशी प्रतिक्रिया येणार. संतोष बांगर यांनी काल सांगितल्यानंतर स्वत: पोलीस संरक्षण घेतलं आहे. त्यांच्या मागे-पुढे पोलिसांच्या गाड्या आहेत. त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. याचा अर्थ त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते पोलीस संरक्षणात फिरत आहेत", असं थोरात म्हणाले. नेमकं काय झालं? कात्रज चौकामध्ये सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. परिस्थिता हाताबाहेर जायच्या आधीच पोलिसांनी नियंत्रण मिळवलं, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते या हल्ल्यातून सुखरुप बचावले आहेत. उदय सामंत यांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या तीन गाड्या होत्या. तसंच स्थानिक पोलिसांच्या पायलट व्हॅनही सामंत यांच्या ताफ्यात होत्या. उदय सामंत हे मोहमद वाडी येथील कार्यक्रम संपवून शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे कात्रज येथील घराजवळ आले होते. इथल्या चौकाजवळ आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे उदय सामंत यांचा ताफा होता. कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांना गाडीत बघितलं त्यानंतर हल्ला केला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या