मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले, आपण...', शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

'ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले, आपण...', शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत, यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत, यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत, यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

जितेंद्र जाधव, प्रतिनिधी

बारामती, 26 ऑक्टोबर : बारामती मर्चंट असोसिएशनच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवारांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केलं. साखर उद्योग, कर तसंच आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर शरद पवारांनी भाष्य केलं.

'अतिवृष्टी झाली, पिकाचं नुकसान झालं. जसं नुकसान झालं त्याला दुसरी बाजू आहे. भू गर्भातील पाणी पातळीत वाढ झाली. पाणी पातळीत वाढ झाली त्याचा फायदा होईल. साखर धंदा या परिसरात नवीन नाही. उत्पादनात आपण वाढ करतोय. साखर कारखान्यांनी वेळेवर पेमेंट दिलं तर बाजारात उत्साहाचं वातावरण असतं,' असं पवार व्यापाऱ्यांना म्हणाले.

'साखर धंद्यात कोल्हापूर महत्त्वाचा जिल्हा आहे. मला तिथल्या लोकांनी सांगितलं साखरेच्या पैशातून साखर कारखाने उत्पन्न चांगलं आहे. कर्ज काढायची गरज नाही. साखरेची जगात गरज आहे. इतर देशात साखर उत्पादनात अडचणी येत आहेत,' अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

दादांसाठी राष्ट्रवादी पुन्हा आशावादी! 'महाविकासआघाडी'मध्ये अजित पवार मुख्यमंत्री?

मोदींचा जीएसटीला विरोध

कर किती असावेत यावर विचार झाला पाहिजे. सोनं खरेदीवर 38 टक्के टॅक्स आहे. ऑटोमोबाईल सेक्टरला 40 टक्के टॅक्स आहे, या टॅक्समुळे परिणाम काय होणार? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आहे.

केंद्र सरकारमध्ये काम करत असताना मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यावेळी त्यांनी जीएसटीची बैठक बोलावली. मात्र जीएसटीला गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी विरोध केला. आज तेच विषय लाऊन धरत आहेत, असा टोला शरद पवारांनी लगावला.

मी मुख्यमंत्री असताना राजू नायर यांनी टेलको कंपनी बंद पाडली होती, त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला होता. व्यापाऱ्यांना चांगले दिवस आणायचे असतील तर राज्य आणि केंद्र सरकारने चांगले धोरण राबवायला हवे. गेल्या काही काळात अमेरिका आणि जर्मनीमधल्या अनेक कंपन्या बंद पडल्या, त्याची संधी म्हणून भारताने घ्यायला हवे, असं पवार म्हणाले.

सुनक पंतप्रधान

ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत, त्यामुळे भारतीय माणूस काहीही करू शकतो, असं विधान शरद पवारांनी केलं आहे.

First published:

Tags: Sharad Pawar