मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'वेदांता'बाबत शरद पवारांनी सांगितली मोठी गोष्ट, करून दिली इतिहासाची आठवण!

'वेदांता'बाबत शरद पवारांनी सांगितली मोठी गोष्ट, करून दिली इतिहासाची आठवण!

Sharad Pawar on Vedanta

Sharad Pawar on Vedanta

वेदांता-फॉक्सकॉन हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या सगळ्या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेदांताबाबत वेगळीच माहिती दिली आहे.

  पुणे, 15 सप्टेंबर : वेदांता-फॉक्सकॉन हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे, तर हे प्रोजेक्ट महाराष्ट्राबाहेर जायला तत्कालिन महाविकासआघाडी सरकार जबाबदार आहे, अशी टीका सरकारकडून करण्यात येत आहे. या सगळ्या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेदांताबाबत वेगळीच माहिती दिली आहे. 'वेदांता प्रकल्प येणार असला तर शेवटपर्यंत येईल का नाही, याबाबत मला शंका असते, कारण यापूर्वीही असं एकदा झालं होतं, फार पूर्वी,' असं शरद पवार म्हणाले आहेत. हा प्रकल्प तळेगावला येणार होता, राज्य सरकारनेही तयारी केली होती, पण आता काही उपयोग नाही. आता चर्चा करण्यात अर्थ नाही. आता जे गेलं ते गेलं, नवीन काय आणता येईल ते बघायला हवं. योग्य वातावरण निर्माण करायला हवं, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. 'दोघं गुजरातचे, तिकडे काही गेलं तर...', वेदांता महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर शरद पवारांचा गुगली
  एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची गंमत वाटते, असं का म्हणाले शरद पवार? वेदांताचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन सांगितलं आहे. महाराष्ट्रामध्ये कंपनी लवकरच मोठी गुंतवणूक करणार असल्याचं ट्वीट अग्रवाल यांनी केलं आहे. 'आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहोत. गुजरात जेव्हीमध्ये महाराष्ट्र हा आमच्या पुढच्या एकीकरणाचा भाग असेल, यातून आम्ही महाराष्ट्रामध्ये हब बनवू,' असं आश्वासन वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दिलं आहे. वेदांताचं 'महा'व्हिजन, प्रोजेक्ट गुजरातला गेल्यानंतर अध्यक्षांनी सांगितलं महाराष्ट्रासाठीचं प्लानिंग
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: Sharad pawar अध्यक्ष

  पुढील बातम्या