Home /News /maharashtra /

शरद पवाराचं कौतुक करत शहाजी बापू पाटील यांचा उद्धव ठाकरेंवर बाण, म्हणाले..

शरद पवाराचं कौतुक करत शहाजी बापू पाटील यांचा उद्धव ठाकरेंवर बाण, म्हणाले..

सासवड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात बोलताना आमदार शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कामाचं कौतुक करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

    सासवड, 2 ऑगस्ट : शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात आता दोन गट तयार झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट. दोन्ही गटाकडून ऐकमेकांवर आरोपाच्या फैरी झडत असतात. आम्ही बंडखोरी केली नाही तर पक्षात उठाव केल्याचा दावा शिंदे गट करत आहे तर आमदारांनी गद्दारी केल्याचा आरोप ठाकरेंकडून वारंवार केला जात आहे. सासवड येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काय म्हणाले शहाजी बापू पाटील? ठाकरे गटाकडून आमच्यावर वारंवार गद्दारी केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, आम्ही गद्दारी केली नाहीतर क्रांती केली आहे. हा पक्षाअंतर्गत उठाव आहे. मातोश्रीने आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधून टाकलं होतं. पण, आता आम्ही मोकळे झालो आहोत. शिंदे साहेब आम्हाला गुवाहाटीला घेऊन गेले नाही तर आम्ही 40 आमदारांनी शिंदे साहेबांना भाजपसोबत नेलं असतं, असा धक्कादायक खुलासा आमदार शहाजी बापू पाटील यांनी बोलताना केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे आम्ही कोणतंही काम घेऊन गेलो असता मारक्या म्हशीगत बघायची, अशी टीकाही पाटील यांनी राष्ट्रवादीवर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्याची तिजोरी खाली केली. पवारांचं कौतुक करता उद्धव ठाकरेंना टोला यावेळी बोलताना शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कामाचं कौतुक केलं. ते म्हणाले, की शरद पवार यांना सर्वात भयानक कँसर आजार झाला आहे. गेली वीस वर्ष ते या आजाराशी झुंज देत आहेत. तरीही सकाळी पाचला उठून रात्री उशीरापर्यंत पवार काम करतात. पण, त्यांनी कधी आजाराचं कारण दिलं नाही. असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. मागे उद्धव ठाकरे यांनी मी आजारी असताना घात केला अशी टीका केली होती. याला पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिलंय. सासवड येथे होत असलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्रई एकनाथ शिंदे, माजी मंत्री उदय सामंत, तानाजी सावंत, माजी आमदार विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शहाजी बापू पाटील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अजित पवारांची 'ती' इच्छा पूर्ण! 2019 ची अशी केली परतफेड मुख्यमंत्र्यांकडून शहाजी बापू पाटील यांचं कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना पुन्हा एकदा ठाकरे गटावर टीका केली. आम्हाला वारंवार गद्दार ठरवलं जात आहे. पण, आम्ही जर बंडखोर आणि गद्दार असतो तर लोकांनी एवढं समर्थन दिलं असता का सांगा? एवढ्या उन्हात तुम्ही इथं आला असता का? लोकांनी आमचा हा निर्णय स्वीकारलाय आहे. आता शहाजी बापू पाटील यांना महाराष्ट्र दौरा द्यायचा आहे. आपल्या सरकारची कामं पोचवण्याची जबाबदारी त्यांना देणार असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: शरद पवार. sharad pawar

    पुढील बातम्या