मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बारामतीमध्ये Sex Racket चा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका तर एजंट अटकेत

बारामतीमध्ये Sex Racket चा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका तर एजंट अटकेत

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Sex racket busted: बारामती पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

बारामती, 21 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्यातील (Pune district) बारामतीत पोलिसांनी (Baramati Police) मोठी कारवाई केली आहे. बारामती पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Sex racket busted) केला आहे. बारामती शहरातील गणेश मार्केट भाजी मंडई परिसरात हा सेक्स रॅकेट सुरू होतं. पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरुन दोन महिलांची सुटका केली आहे.

भाजी मंडई परिसरात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती बारामती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बारामती पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरुन पोलिसांनी महिला एंजटला अटक केली आहे. तर दोन महिलांची सुटका केली आहे.

डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी टाकला छापा

भाजी मंडई परिसरता वेश्या व्यवसाय सुरू असल्याती माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या माहितीची खातरजमा केली. मग पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी एक डमी ग्राहक पाठवला. डमी ग्राहकासोबत सौदा फिक्स झाल्यावर त्याने पोलिसांना इशारा केला आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे.

या प्रकरणी बारामती पोलिसांनी महिला एजंटला अटक करुन तिच्याकडून रोख रक्कम आणि मोबाइल फोन जप्त केला आहे. पोलिसांनी याप्रकऱणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

वाचा : मित्राने केला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, पुण्यातील घटनेने खळबळ

पुण्यात लॉजवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे-सोलापूर महामार्गालगत एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी पर्दाफाश केला होता. सायबर पोलीस आणि यवत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हा छापा टाकला होता. यावेळी पोलिसांनी लॉजवर वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका दलालाला बेड्या ठोकल्या. तसेच लॉजचा मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायात अडकलेल्या सहा तरुणींची सुटका केली होती.

रवीश शेट्टी असं अटक केलेल्या 35 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो मूळचा कर्नाटकातील उडपी येथील रहिवासी आहे. आरोपी शेट्टी हा खडकी-दौंड येथील सुर्या लॉजवर सहा तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. गेल्या बऱ्याच दिवसांपासून याठिकाणी हा वेश्याव्यवसाय सुरू होता. अत्यंत गुप्तता पाळून हा व्यवसाय सुरू होता. त्यामुळे बरेच दिवस याची खबर पोलिसांना देखील नव्हती.

वाचा : पूजा हत्याकांडाचा उलगडा; पतीच निघाला हत्येचा मास्टरमाईंड

Mumbai मध्ये Sex Tourism रॅकेटचा पर्दाफाश

ऑक्टोबर महिन्यात मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत सेक्स टुरिझमचा (Sex Tourism) पर्दाफाश केला. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्राँचने दोन महिला दलालांना अटक केली. तर दोन तरुणींची सुटका करण्यात आली. आरोपी महिला ही दोन तरुणींना घेऊन मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

ही टोळी सर्वप्रथम ग्राहक शोधत असे. जर ग्राहक मिळाला तर त्यानंतर बोलणी अंती डील फायनल केली जात असे. यानंतर ही टोळी तरुणींना ग्राहकांसोबत संपूर्ण भारतभर फिरण्यासाठी पाठवत असे. भारतातील विविध पर्यटनस्थळांवर फिरण्यासाठी त्यांना पाठवण्यात येत होते. गोवा हे त्यांचे आवडते ठिकाण होते. यावेळी ग्राहकांसोबत देह व्यापार केला जात असे.

First published:

Tags: Baramati, Crime, Pune, Sex racket