मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक! पुण्यात वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; राहत्या घरात आढळला मृतदेह

धक्कादायक! पुण्यात वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; राहत्या घरात आढळला मृतदेह

Suicide in Pune: पुण्यात एका वरिष्ठ पदावरील माहिला पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या (senior Police inspector commits suicide) केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 31 डिसेंबर: काही दिवसांपूर्वी पुण्यात भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. ही खळबळजनक घटना ताजी असताना, आता पुण्यातील (Pune) आणखी एका वरिष्ठ पदावरील माहिला पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या (senior Police inspector commits suicide) केली आहे. संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरात ओढणीनं गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच पोलीस प्रशासनाला धक्का बसला आहे.

या घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. शिल्पा चव्हाण असं आत्महत्या करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचं (senior Police inspector Shilpa Chavhan suicide) नाव असून त्या पुणे शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होत्या.

हेही वाचा-एकाच दिवशी पेटल्या तीन चिता; 3 वेगवेगळ्या घटनेत नातू, आजोबा अन् आजीचा भयावह अंत

मृत शिल्पा यांनी विश्रांतवाडी येथील शांतीनगर भागातील आपल्या राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी घटनास्थळाची कसून झडती घेतली, असून आत्महत्येच्या मुख्य कारणाचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा- धक्कादायक! पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या; गळफास घेत संपवलं जीवन

मृत शिल्पा चव्हाण या सध्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत होत्या. चव्हाण यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. तसेच त्यांचा कामाच्या बाबतीत देखील दरारा होता. लॉकडाऊनच्या कालावधीत त्यांनी अनेक गरजू लोकांना मदतीचा हात दिला होता. तसेच ‘ई- पास’ची जबाबदारी देखील त्यांनी समर्थपणे पार पाडली होती. अनेक दिवस त्यांनी भरोसा सेलमध्ये देखील काम केलं होतं.

First published:

Tags: Crime news, Pune, Suicide