वारकरी या रिंगणसोहळ्यादरम्यान, हरीनामाच्या गजरात लीन झाले होते. सगळ्यात आधी धावले ते झेंडेकरी त्यानंतर तुळस घेऊन धावणार्या महिला वारकरी आणि नंतर वीणेकरी आणि मग टाळकर्यांनी एकच जयघोष करत रिंगण गाजवलं आणि शेवटी कळस चढवला तो मानाच्या अश्वांनी. अश्व धावताच लाखो वारकर्यांनी विठूनामाचा गजर करत कीर्तनाची जी द्रुत ताल पकडली ती इंदापूरच्या आसमंतात मग कित्येक क्षण गर्जतच राहिली.भक्तीने भारलेला रिंगण सोहळा, पाहावा याचि देही याची डोळा... ! संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं इंदापूरमध्ये स्वागत झालं आणि त्यानंतर रंगला हा असा रिंगण सोहळा.. पाहा ड्रोन फूटेज #SantTukaramMaharaj #AshadhiEkadashi pic.twitter.com/4gPinLeC2E
— News18Lokmat (@News18lokmat) July 2, 2022
आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरमधील (Pandharpur) लाखो वारकऱ्यांचे विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर येते. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो वारकरी (Warkari) पायी चालत पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) करतात. हा दिवस महाराष्ट्रत अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आषाढ महिण्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. यंदा आषाढी एकादशी 10 जुलै रोजी (Ashadi Ekadashi 2022 Date) आहे. या दिवशी आळंदी, देहू आणि पैठणसह अनेक ठिकाणांहून संत महंतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात. या दिवशी ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते घरीच विठ्ठलाची पूजा (Ashadhi Ekadashi Vrat) करून उपवास करतात.नाम तुकोबाचे घेता , डोले पताका डौलात, अश्व धावता रिंगणी, नाचे विठू काळजात.. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण इंदापूरमध्ये रंगलं. त्याचा हा ड्रोनच्या साहाय्याने घेतलेला VIDEO#AshadhiEkadashi pic.twitter.com/pDGpD9WJgP
— News18Lokmat (@News18lokmat) July 2, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pandharpur, Wari