Home /News /maharashtra /

दोन वर्षांनी दिवे घाट असा फुलला! माऊलींच्या पालखीची Drone द्वारे घेतलेली विहंगम दृश्य

दोन वर्षांनी दिवे घाट असा फुलला! माऊलींच्या पालखीची Drone द्वारे घेतलेली विहंगम दृश्य

भक्तिभावपूर्ण वातावरणात विठ्ठलनामाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यातून पुढे मार्गस्थ होत आहे.

    पुणे, 24 जून : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून निघून आज दिवे घाट पार करून पुढे जात आहे. ड्रोनच्या साहाय्याने या पालखी मार्गाचं चित्रीकरण केलं गेलं आहे. माउलीच्या पालखीचे आगमन पुणे ग्रामीण हद्दीत होत आहे. दिवे घाटामध्ये पोलिसांच्या ड्रोनद्वारे केलेले चित्रीकरण आहे. भक्तिभावपूर्ण वातावरणात विठ्ठलनामाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यातून पुढे मार्गस्थ होत आहे. कोरोनानंतर पालखीमध्ये वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून येत आहे. भक्तीमय वातावरणामुळे पुणे परिसरात उत्साहाला उधाण आलं. गुरुवारी वारकऱ्यांनी मेट्रो सफरीचाही आनंद घेतला. पुणेकरांचा पाहुणचार घेऊन दोन्ही पालख्या आज पंढरपूरकडे मार्गस्थ (Pune Metro VIDEO) झाल्या आहेत. मागील दोन दिवस पुण्यात पाहुणचार घेतल्यानंतर आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उरुळी कांचन कडे मार्गस्थ झाला आहे. यंदा 10 जुलै दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यापूर्वी पंढरपूरात या पालख्या दाखल होणार आहे. दोन वर्षांनंतर पायी वारी होत असल्याने वारकर्‍यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, Pune news

    पुढील बातम्या