Home /News /maharashtra /

Pune : पंढरीच्या वारीची जागतिक स्तरावर नोंद घेतली जावी, यासाठी आमदारांनी प्रयत्न करावेत : संभाजीराजे छत्रपती

Pune : पंढरीच्या वारीची जागतिक स्तरावर नोंद घेतली जावी, यासाठी आमदारांनी प्रयत्न करावेत : संभाजीराजे छत्रपती

पंढरपूरच्या

पंढरपूरच्या वारीला जागतिक वारश्यात स्थान मिळावे - छत्रपती संभाजी महाराज

विठ्ठलाच्या भेटीसाठी लाखोंच्या संख्येने जाणारे वारकरी पुण्यात मुक्काम घेतात. अशा पंढरीच्या वारीची जागतिक पातळीवर नोंद व्हावी, यासाठी संभाजीराजे छत्रपती प्रयत्नशील आहेत. पण, इतर आमदारांनीही प्रयत्न करावेत, असंही संभाजीराजे म्हणाले.

पुढे वाचा ...
    पुणे, 23 जून : संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचे आळंदीतून (Ashadi Wari 2022) प्रस्थान पुण्याच्या दिशेने झाले आहे. यावेळी विश्रांतवाडी चौकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन झाले होते. यावेळी जोरदार पावसाला सुरवात झाली, अशा भर पावसामध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या स्वराज्य पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. (Pandharichi Wari in Pune) आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत फुगडीचा फेर छत्रपती संभाजी महाराजांनी धरला. छत्रपती संभाजी महाराज यांनी वारीमध्ये सहभाग घेतला होता. विश्रांतवाडीच्या चौकांमध्ये पालखीचे आगमन झाले तशी जोरदार पावसाने हजेरी लावली. अशा पावसामध्ये छत्रपती संभाजी महाराज चिंब भिजले होते. तरीदेखील त्यांचा उत्साह काही कमी झाला नाही, त्यांनी पावसामध्ये कार्यकर्त्यांनी दिलेली छत्री नाकारली आणि भर पावसात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. वाचा : अखेर एकनाथ शिंदेंचा पुढील प्लान ठरला; नव्या Video मुळे सत्तेच्या संभ्रमाला The End! यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "2 वर्षानंतर वारीमध्ये सर्वसामान्य लोक सामील झाले आहेत. एक वेगळ्या प्रकारचा उत्साह इथे जाणवत आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे इथे तुकोबांची पालखी असो किंवा ज्ञानेश्वरांची पालखी असो त्यांना वंदन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस येतो. त्यातलाच मी एक आहे. इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी यांनी देखील पालखीला संरक्षण दिले होते आणि या वर्षापासून आमच्याकडून तुकाराम महाराजांच्या पालखीचे देखील जरीपताका देण्यात आलेला आहे." वाचा : ‘शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही’, अजित पवारांचं मोठं विधान "सर्वसामान्य माणसांच्या उत्साहात आम्ही सामील होता यावे, यासाठी मी इथे आलेलो आहे. खरंतर जागतिक वारसा हक्कांमध्ये या आपल्या पालखी सोहळ्याची नोंद कसे करता येईल, यासाठी मी पार्लमेंटमध्ये आग्रही होतो. फक्त महाराष्ट्रापुरतं न विचार करता 20 लाख लोकांचा या वारीमध्ये सहभाग असतो. देशभरामध्ये आणि जागतिक स्तरावर ती याची नोंद घेतली जावी, यासाठी माझा प्रयत्न आहे. या सोबतच सर्व खासदार आणि आमदारांनीदेखील जागतिक स्तरावर आपली वारी जागतिक वारसा म्हणून याची नोंद केली जावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे", असंही संभाजी छत्रपती यांनी सांगितले.
    First published:

    Tags: Maharashtra News, Pune, Wari

    पुढील बातम्या