मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'खोटा इतिहास पेरण्याची सुपारी घेतलीये का'?, संभाजी ब्रिगेडचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

'खोटा इतिहास पेरण्याची सुपारी घेतलीये का'?, संभाजी ब्रिगेडचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

राज ठाकरे

राज ठाकरे

संभाजी ब्रिगेडकडून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India
  • Published by:  Ajay Deshpande

पुणे : संभाजी ब्रिगेडकडून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. चित्रपटाच्या माध्यमातून खोटा इतिहास दाखवण्याचं काम सुरू आहे. खोटा इतिहास मांडण्याचं काम केलं जातंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील त्यांना समर्थन देत आहेत. छत्रपतींचा इतिहास जिथं विकृत केला गेला तिथं राज ठाकरे आहेत. खोटा इतिहास पेरण्याची सुपारी घेतली आहे का? छत्रपती सगळ्या जातीचे आहेत. हिंदू आणि मुस्लिम दंगली पसरवण्याचं काम राज ठाकरेंनी केलं आहे, असा आरोप मनोज आखरे यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते.

राज्यपालांवर हल्लाबोल  

दरम्यान दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून देखील आखरे यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला आहे. राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राज्यपाल कोश्यारी आम्हाला महाराष्ट्रात नकोत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना याबाबत पत्रव्यवहार केला, मात्र उत्तर आलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराजांची बदनामी खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा :  शिवस्मारकासाठी राजभवनच योग्य जागा, संभाजी ब्रिगेडची भूमिका

शिवस्मारकासाठी राजभवन योग्य जागा  

दरम्यान शिवस्मारकाचा प्रश्न प्रलंबित आहे. शिवस्मारक जमिनीवर व्हावे, आणि त्यासाठी योग्य जागा ही राजभवन असल्याचं मनोज आखरे यांनी म्हटलं आहे.

First published: